बंधन..

आज पाच वर्षे झाली, पण काळ जणू त्याच क्षणावर थिजून राहिला आहे. मनाच्या एका कोपऱ्यात आजही तिचीच प्रतीक्षा सुरू आहे, जिथं आमची शेवटची भेट झाली होती. मी पावलांनी अजूनही तिथेच थांबलोय, पण ती मात्र मनानं खूप खूप दूर निघून गेलीय. मी तिला अनेक विनवण्या केल्या, हाका मारल्या, पुन्हा कधी भेटशील गं.? असंही सतत विचारत राहिलो, पण तिच्याकडून पुन्हा कधीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित ती आता त्या नात्याच्या बंधनातून मुक्त झाली आहे. पण मी मात्र त्या भेटीच्या आठवणींचे ओझे वाहत त्याच जागी उभा आहे, आणि ती मागे न पाहता कधीची कायमची पुढे निघून गेली आहे. बहुतेक हेच ते #आयुष्य_वगैरे जिथं एक जण कायमस्वरूपी तिथेच थांबतो आणि दुसरा मात्र प्रवासात हरवून जातो. माझ्या भूतकाळाच्या त्या एकमेव सोनेरी पानावर माझे आयुष्य अडकून पडले आहे, तर तिने तिचे तेच पुस्तक पुन्हा नव्याने सुरू केले आहे. तिच्या विरहाच्या या वेदनेत एक अनामिक तळमळ आहे, जी मला रोज तिथेच नेऊन उभी करते. मी आजही तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलोय, कदाचित कधीतरी ती मागे वळून बघेल या आशेवर. पण वास्तव बहुतेक हेच आहे की, ती आमची पहिली आणि शेवटची भेट होती. तिची ती पावलं बहुतेक पुन्हा कधीच माझ्यासाठी मागे फिरणार नाहीयेत. काही माणसं आयुष्यात फक्त एक सुंदर वळण म्हणून येतात, आणि सरळ रेषेत पुढे पुढे निघून जातात, आणि मागे उरतो तो फक्त आठवणींचा धूर आणि कधीही न मिटणारा एक एकांत. आता या थांबलेल्या प्रवासाला कोणती दिशा द्यायची, हेच मला समजेनासे झाले आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट