एकमेव मार्ग... ❤️‍🩹🫂

आयुष्यात सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो, जेव्हा आपली काहीही चूक नसताना समोरची व्यक्ती आपल्याबद्दल एक पूर्वग्रहदूषित मत बनवून बसते. आपण मनात कोणताही खोट न ठेवता, फक्त ते नातं टिकावं म्हणून समोरच्याला सतत स्पष्टीकरण देत राहतो. "माझा तो हेतू नव्हता", "माझं बोलणं नीट समजून घे", अशी विनवणी आपण पुन्हा पुन्हा करत राहतो. पण दुर्दैवं असं की, आपण जितके जास्त खुलासे करतो, तितका समोरच्याचा तो चुकीचा समज अधिक घट्ट होत जातो. त्यांना वाटू लागतं की, आपण सारखं स्पष्टीकरण देतोय म्हणजेच नक्कीच आपलीच काहीतरी चूक असणारच. हा विरोधाभास मनाला आतून पोखरून टाकतो. आणि आपला चांगुलपणाच शेवटी आपल्या अगतिकतेचं कारण बनतो. खोट्या आरोपांचे ढग जेव्हा आपल्या निष्पापपणाला झाकून टाकतात, तेव्हा होणारी घुसमट असह्य असते. प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतःचाच स्वाभिमान गमावून बसतो की काय अशी भीती वाटू लागते. शेवटी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, ज्याला समजून घ्यायचंच नाही, त्याला जगातील कुठलेही शब्द पटवून देऊ शकत नाहीत. शांत राहणं म्हणजे चूक मान्य करणं नव्हे, तर कधीकधी स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि स्वाभिमानासाठी घेतलेली ती एक सन्मानजनक माघार असते. तुमच्या नितळ मनाची किंमत न समजणाऱ्या लोकांसमोर शब्दांचा अपव्यय थांबवणे, हाच या मानसिक त्रासातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट