काही प्रश्नांना उत्तरं नसतात..! 🫂❤️🩹
आयुष्याचा खेळ खरंच किती विचित्र असतो ना. कधी कधी आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो, अशा वेळी अचानक एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. ती अशी असते, जी आपल्याला नेहमीच आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी हवी होती, अगदी आपल्या मनासारखी. सुरुवातीला वाटतं की हे सगळं एक सुंदर स्वप्न आहे. हळूहळू, नकळतच आपल्याला तिची इतकी सवय होऊन जाते की तिच्याशिवाय दिवसाची सुरुवात आणि शेवटही अपूर्ण वाटू लागतो. तिचा/त्याचा तो आवाज, असणं, दिलेली ती खोटी-खरी आश्वासने, सगळंच आपल्या जगण्याचा एक भाग बनून जातं. आपण तिच्यावर/त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो आणि आपल्या संपूर्ण आयुष्याची दोरी तिच्या/त्याच्या हातात सोपवून देतो. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. जेव्हा आयुष्यात सर्वात मोठ्ठं वादळ येतं, जेव्हा आपल्याला तिची/त्याची, त्यांच्या साथीची आणि आधाराची सगळ्यात जास्त गरज असते, नेमक्या त्याच वळणावर ती व्यक्ती आपल्याला अर्ध्या रस्त्यात सोडून निघून जाते. ती/तो तर पाठ फिरवून निघून जातात, पण आपल्या वाट्याला मागे उरते फक्त एक अथांग रिकामेपण, एकटेपण, जे शब्दांत सांगताच येत नाही. आता आपण गर्दीत असूनही आतून पूर्णपणे एकटे पडलेले असतो. कोणाशी काही बोलायची इच्छा होत नाही, ना कुठे जायची, ना कोणाकडे मन मोकळं करायची. फक्त एकांतात मन रमू लागतं सगळं काही संपल्यासारखं वाटतं. असं वाटतं की आतून काहीतरी कायमचं तुटून गेलंय, ज्याचे तुकडे आता कधीच एकत्र जोडले जाऊ शकत नाहीत. ज्या व्यक्तीने जगायला शिकवलं, तिच्या/त्यांच्या सोबत आपण कित्ती काही सुंदर स्वप्नं रंगविली, तीच व्यक्ती असं जिवंतपणी मारून, आपल्याला सोडून निघून जाईल असं आपल्याला कधी स्वप्नातही वाटलेलं नसतं. हा विरह, हा नकार आणि हे असं अचानक सोडून जाणं माणसाला आतून पार पोखरून जिवंतपणी मारून टाकतं. आपण फक्त जिवंत असतो, पण आपल्या जगण्यातला तो जिवंतपणा कुठेतरी हरवून गेलेला असतो. डोळ्यांसमोर फक्त तिच्या/त्याच्या आठवणींचा पसारा असतो आणि मनात एकच प्रश्न की, जर असं अर्धवट सोडूनच जायचं होतं, तर मग इतकं जवळ तरी का केलं होतं..!?🎭
#आयुष्य_वगैरे 🫂❤️🩹