Gen Z चे YZ आंदोलन - १

सध्या जंतरमंतरवर जे काही नाट्य सुरू आहे, ते डोळसपणे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की आंदोलन आणि अराजकता यातील पुसट रेषा आता पूर्णपणे पुसून टाकण्यात आली आहे. आपल्या देशात लोकशाहीने प्रत्येकाला निषेध करण्याचा, आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला आहे, यात तीळमात्र शंका नाही. उदाहरणार्थ जर रस्ता खराब आहे, म्हणजेच व्यवस्थेत काही त्रुटी आहेत, हे जर तुमचे गाऱ्हाणे असेल, तर त्यावर आवाज उठवणे गैर नाही. पण रस्ता खराब आहे म्हणून मी थेट विरुद्ध दिशेने गाडी चालवणार, सिग्नल तोडणार आणि अपघाताला निमंत्रण देणार, हा कसला शहाणपणा..? आज जंतरमंतरवर नेमकी हीच 'अतिशहाणी' मानसिकता उघडी पडत आहे. मूळ प्रश्नावरून लक्ष भरकटवून कायद्याला आणि व्यवस्थेलाच ओलीस धरण्याचा हा एक सुनियोजित खेळ आहे. जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांचे जगणे असह्य करता, तेव्हा तुम्ही हक्कांची भाषा बोलण्याचा नैतिक अधिकार गमावून बसता. उदाहरणार्थ वाहतुकीचे नियम हे रस्ता चांगला असो वा वाईट, सुरक्षिततेसाठी असतात. तसेच लोकशाहीचे नियमही व्यवस्था टिकवण्यासाठी असतात. पण इथे तर 'आम्हाला हवे तेच होणार, नाहीतर आम्ही संपूर्ण वाहतूकच ठप्प करू' अशी उघड धमकी दिली जात आहे. हा निव्वळ हट्ट नाही, तर लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली हुकूमशाही आहे. आणि सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे, या अराजकतेला काही स्वयंघोषित बुद्धिवंत आणि माध्यमवीर 'क्रांती'चे लेबल लावून मोकळे होत आहेत. पण जनतेला वेड्यात काढण्याचा हा प्रयत्न फार काळ टिकत नसतो, हे या आंदोलकांनी आणि त्यांच्या पडद्यामागच्या सुत्रधारांनी लक्षात ठेवलेले बरे.!🎭

#मनात_येईल_ते 

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट