सरकारमान्य
दारू प्यायला पैसे नाहीत म्हणून कालच गल्लीतल्या एका युवकाने घरातील गॅसची टाकी विकून त्याची व्यसनाची तलब भागवली होती. आणि आज दुपारीच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर आली. एकुलतं एक पोरगं गेलं म्हणून त्याचं आईबाप उर बडवून रडत होतं. आणि मी या विचारात हरवून गेलो होतो की, वर्षानुवर्षे कित्येक संसार उद्धवस्त करणारी ही दारू सरकारमान्य कशी काय असू शकते.? आणि देवानं जगातलं सगळं आईबाप घडवताना नेमकी कोणती जादुई माती वापरली असावी, की त्यांची मुलं कशीही वागली, कितीही माणूसघाणी निपजली तरीही, शेवटपर्यंत त्या आईबापाचं आपल्या मुलांप्रती असलेलं प्रेम तसूभरही कमी कसं काय होत नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂