लहानपण देगा देवा...
माझ्या गरिबीची, माझ्या अवस्थेची, माझ्या दिसण्याची किंवा माझ्या परिस्थितीची पर्वा न करता, तिच्या केवळ एका नजरेसाठी आणि स्मितहास्यासाठी, तिला दररोज निदान एकदातरी डोळे भरून पाहण्यासाठी मी जे कष्ट घ्यायचो, जी धडपड करायचो, जी पायपीट करायचो, ते फक्त माझं मलाच ठाऊक. पण त्यावेळी माझ्या त्या बालमनाला, माझं ते प्रेम शब्दांत व्यक्त करता आलं नाही. परंतु माझ्या डोळ्यांतील ती आर्तता आणि तिच्याविषयीच्या अबोल भावना ह्या जगातील कोणत्याही भाषेतून व्यक्त होणाऱ्या प्रेमापेक्षा नक्कीच श्रेष्ठ अशा होत्या.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂