#प्रेम_आई ❤️

मदर्स डे आला की वाटतं, निदान आजच्या दिवशी तरी आईने फक्त 'आई' असावं, 'सुगरण' किंवा 'गृहिणी' नको. पण सकाळच्या चहापासून रात्रीच्या ताटापर्यंत तिचं अस्तित्व घराच्या कोनाकोपऱ्यात असं विणलं गेलंय की, तिला कामापासून वेगळं करणं केवळ अशक्य होऊन बसतं. मी तिला विश्रांती द्यायचा कितीही प्रयत्न केला, तरी तिचं मन मात्र घराच्या रहाटगाडग्यातच अडकलेलं असतं. कदाचित तिची ही अखंड सेवाच तिचं आपल्या कुटुंबावर प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. म्हणूनच अगदी फार फार लहानपणापासूनच, मी दररोज आणि विशेषकरून आजच्या या दिवशी तिला तिच्या या नेहमीच्या आवडत्या रहाटगाड्यापासून दूर न करता, तिला तिच्या कामात थोडासा हातभार लावून 'आम्हीही आहोत तुझ्यासोबत' ही जाणीव सतत करून देत असतो. पण तरीही वाटत राहतं की, एका लेकीची आपल्या आईवर असलेली माया मात्र काही औरच असते, आणि ती माया माझ्या आईच्या वाट्याला नियतीने लिहिलेली नाहीये, म्हणून तिला तिची कमतरता कधीच न भासू देणं हा प्रामाणिक प्रयत्न सुध्दा सुरूच असतो.!
#MothersDay #प्रेम_आई ♥️ #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट