अदृश्य धागा.. 👩‍❤️‍👨

अगं.. ऐकलंस का..? उगाच असा रागाराग करू नकोस. 
तुझी मनस्थिती मी समजू शकतो, पण प्रेम लादता येत नाही आणि त्याची सक्तीही करता येत नाही, हे वास्तव स्वीकारणं जितकं शहाणपणाचं तितकंच ते वेदनादायी ही आहे गं. आज आपण दोघंही अशा एका धूसर छायेत उभे आहोत, जिथे ना ओढ स्पष्ट आहे, ना दुरावा. तुझ्या मनात माझ्यासाठी नेमकं काय आहे, हे कोडं मला सुटत नाहीये आणि कदाचित तुलाही ते उमजत नसावं. तू मला पूर्णपणे आपलंसं करत नाहीस आणि कायमचं परकं करून दूरही ढकलत नाहीस. तुझ्या वागण्यात प्रेमाचा ओलावा ही नाही आणि तिरस्काराची धारही नाही. तरीही कुठेतरी एक अदृश्य धागा आहे जो तुला माझ्यापासून दूर जाऊ देत नाहीये. हे नसलेलं नातं आणि ही संदिग्धता आता मला खूप खूप व्याकुळ करते आहे. तू मला का धरून ठेवलंयस हे माहीत नाही, पण या मी तुला 'हवं असण्याच्या' आणि 'नको असण्याच्या' हिंदोळ्यावर माझं मन मात्र पुरतं अडकून पडलंय गं.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट