माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त तू ❤️

तू समोरून कोणताही प्रतिसाद न देणं, माझ्या भावनांकडे साफ दुर्लक्ष करणं किंवा पूर्णपणे अबोल राहणं, यामुळे माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. कारण माझं तुझ्यावर असणारं प्रेम हे तुझ्या वागण्यावर किंवा तुझ्या उत्तरावर अवलंबून नाहीच मुळी. ते तर पूर्णपणे माझं स्वतःचंच आहे, जे मी अगदी मनापासून फक्त तुलाच वाहिलंय. तू कशीही वागलीस तरी माझं हे वेडं मन तुझ्याभोवतीच घुटमळत राहील, कारण माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला जागाच नाही. तू माझं पहिलं, शेवटचं आणि एकमेव प्रेम आहेस, ज्याची जागा जगातील कोणतीच गोष्ट घेऊ शकत नाही. तुझा हा अबोलपणा, तुझी ही शांतता माझ्या प्रेमाची परीक्षा घेऊ शकत नाही, उलट ती मला तुझ्या आणखी जवळ घेऊन जाते. म्हणूनच सांगतोय वेडाबाई, तू कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केलास, तरी माझ्या हृदयात धडधडणारं प्रत्येक स्पंदन फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच असेल.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट