जगण्याची आशा...

ज्या सवयीने कधीकाळी जगण्याला अर्थ दिला, आज तीच सवय श्वास घेणं कठीण करतेय. तू तर अगदी सहज मागे वळून भूतकाळात पाहिलंस आणि कालांतराने लगेचच पुन्हा स्वतःचा वर्तमानाचा रस्ता निवडलास, पण माझ्या पावलांना मात्र अजूनही तुझ्याच सावलीची ओढ लागून राहिली आहे. तुझ्यासाठी हा दुरावा कदाचित शांतता असेल, आणि तुला हवाहवासा ही असेल, पण माझ्यासाठी मात्र तो एक न संपणारा कोलाहल आहे. विरहाच्या या गर्द काळोखात आता माझ्यासाठी फक्त एकच प्रश्न उरला आहे की, ज्या नात्याची सुरुवात इतकी सुंदर आणि अगदी नकळत झाली, त्याचा शेवट इतका जाणीवपूर्वक आणि वेदनादायी का असावा गं..?🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट