अबोला..

प्रिय प्रेयसी.. ❤️
पत्रास कारण की, तुझी खूप खूप आठवण येते आहे गं, अगदी प्रत्येक क्षणाला तुझाच विचार मनात घोळत असतो. पण माझ्या या अनावर ओढीमुळे तुला कोणताही मानसिक त्रास होऊ नये, तुझ्या रोजच्या आयुष्यात अडथळा येऊ नये, म्हणूनच मी स्वतःला थांबवतो. दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत माझ्या या वेड्या मनाला आवर घालावा लागतो. तुझ्याशी बोलण्याची, तुला पाहण्याची, तुला अगदी घट्ट कडकडून मिठीत घेण्याची तीव्र इच्छा मनात दाबून ठेवताना आतल्या आत खूप घालमेल होते गं. पण तुझ्या सुखासाठी आणि तुझ्या शांततेसाठी हा विरह सोसणे मला भाग आहे. तुझ्या भावनांचा आदर करण्यासाठी मी माझ्या भावनांना कुलूप लावून ठेवले आहे. जरी मी तुझ्यापासून दूर असलो, तरी माझ्या मनातली तुझी जागा आणि तुझ्याप्रती माझे असलेले प्रेम कधीच कमी होणार नाही. तुला त्रास न देता, तुझी आठवण काढत राहणे हाच आता माझ्या जगण्याचा एक मूक भाग बनला आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂
फक्त तुझाच @psychosrd

लोकप्रिय पोस्ट