प्रेयसी ❤️
आयुष्याच्या प्रवासात काही नाती नाव न घेताच आपल्या सोबतीला राहतात. एक असंच नातं म्हणजे आपल्या प्रेयसीचं.! ती केवळ प्रेमिका नसते, तर तो एक असा कोपरा असतो जिथे आपण जगाचे सगळे मुखवटे काढून शांतपणे श्वास घेऊ शकतो. पत्नी म्हणून तिला घराच्या उंबरठ्यात स्थान देता येत नसले, तरी मनाच्या गाभाऱ्यात तिचेच अस्तित्व कायम असते. तिच्याशी असलेले नाते हे समाजाने दिलेल्या व्याख्ये पलीकडले असते, जिथे शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलते. अशा प्रेमाचे रूपांतर लग्नात न होणे, ही कदाचित त्या नात्याची शोकांतिका असेल, पण तोच त्या आपल्या पुरुषांचा सर्वात मोठा आणि न तुटणारा आधार असतो. कधीही पूर्ण न होणाऱ्या त्या अपूर्णतेतच त्या नात्याचे सर्वात सुंदर सत्य दडलेले असते.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂