माझीही गोष्ट हीच आहे...

काल माझी एक पोस्ट वाचून इथल्या एका मित्राने कमेंट केली की, फार काही फरक नाही, आपल्या दोघांची गोष्ट जवळपास एकसारखीच आहे. आणि तेव्हा सहज मनात एक विचार येऊन गेला की, खरंच तर आहे, आपण सगळीजण सामान्य माणसं, आणि सामान्य माणसाचं आयुष्य थोड्याफार फरकाने अगदी एकसारखंच तर असतं. आपण वरवर कितीही वेगळे दिसत असलो, तरी आपल्या सर्वांच्या संघर्षाचा आणि आनंदाचा गाभा मात्र एकच असतो. त्याच मध्यमवर्गीय स्वप्नांची गोळाबेरीज, रोजची धावपळ आणि संध्याकाळी घराकडे वळताना मनावर असणारं उद्याच्या चिंतेचं थोडंसं ओझं. कधीतरी वाटतं की आपण एकटेच हे सगळं भोगतोय, पण जेव्हा कुणी म्हणतं ना, 'माझीही गोष्ट हीच आहे', तेव्हा जाणवतं की आपण एकाच अथांग प्रवासाचे सहप्रवासी आहोत. हे 'सारखेपण' आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवतं आणि हीच सामान्यता आपल्या जगण्याला एक वेगळीच सुरक्षितता अन् ऊब देते. अखेरीस सामान्य माणसाच्या साध्या गोष्टीतच आयुष्याचं खरं तत्त्वज्ञान दडलेलं असतं. बरोबर ना.!?🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट