निष्ठा

१० मे. आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातील एक अशी जखम आहे जी कधीच भरून येणार नाही, असं मला वाटलं होतं. कारण आजच्याच दिवशी माझं तुला आपलं करण्याचं स्वप्न काचेसारखं विखुरलं होतं. तुझ्यापासून दूर होण्याच्या त्या क्षणी माझ्या जगाचा अंत झाला असं वाटलं होतं, पण त्याच अंधारात मला माझ्या प्रेमाच्या खऱ्या शक्तीची जाणीव झाली. तू माझी होऊ शकली नाहीस, हे वास्तव स्वीकारताना माझ्या मनाने एक वेगळीच उंची गाठली. माझं तुझ्यावरचं प्रेम हे तुला मिळवण्यासाठी नव्हतंच, तर ते केवळ तुझ्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी होतं. तू माझी झाली नाहीस म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होईल इतकं ते तकलादू नक्कीच नव्हतं. उलट, तुला न मिळवताही तुझ्यावर तितक्याच निष्ठेने प्रेम करत राहण्यात एक वेगळं समाधान मला गवसलं. प्रेम म्हणजे केवळ हक्क गाजवणं नसतं, तर समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आपला आनंद शोधणं असतं, हे मला त्या दिवशी उमजलं. म्हणूनच आज तू जिथे कुठे असशील, तिथे सुखात असावीस हीच माझी एकमेव प्रार्थना असते, आणि यातच माझ्या प्रेमाचं सार्थक आहे. तुझे आनंदाचे क्षण हेच माझ्या जगण्याचे आधार बनले आहेत. तुझ्या सुखातच माझं सुख मानणं, हीच माझ्या प्रेमाची सर्वोच्च पायरी आहे, आणि ती मी आयुष्यभर जपणार आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट