अशी कशी गं तू... ❤️
मी तिला पहायला नको म्हणून बहुतेक घाईघाईत तिने सेटिंग्ज बदलले, आणि मला तिला पाहण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण तिला हे ठाऊक नाही की स्क्रीनवरचा तिचा तो छोटासा डीपी म्हणजे तिचं अस्तित्व नव्हे. तिने बदललेल्या प्रायव्हसी सेटिंग्जमुळे कदाचित तिचा चेहरा आता माझ्या फोनवर दिसणार नाही, आणि दिसतही नाहीये, पण माझ्या काळजाच्या गॅलरीत तिचे असे कितीतरी 'अनफिल्टर्ड' फोटो आजही जतन केलेले आहेत. त्या वेडाबाईला कदाचित विसर पडला असेल, की एकेकाळी तिनेच प्रेमाने पाठवलेले तिच्या आठवणींचे अगणित क्षण आजही माझ्या आठवणींच्या सुरक्षित लॉकरमध्ये बंदिस्त आहेत. अगं वेडाबाई, हे तुला माझ्यापासून लांब ठेवू शकेल गं, पण माझ्या मनातल्या त्या फोटोंना डिलीट करण्याची, मला हवं तेव्हा तुला डोळेभरून पाहण्यापासून अडवण्याची ताकद कोणत्याच सेटिंगमध्ये नाही. तुझं दिसणं जरी थांबलं असलं, तरी तुझं असणं आजही तिथेच आहे, अगदी सुरक्षित आणि कायमस्वरूपी..!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂