सावर रे...❤️

दिवसरात्र मनामध्ये फक्त तुझाच विचार गोंधळ घालतोय. प्रत्येक क्षण आणि अगदी अगदी रात्रीची शांतता सुद्धा मला तुझीच आठवण करून देतेय. या आठवणी आता केवळ आठवणी उरल्या नसून, तो एक न थांबणारा छळ झाला आहे. मनात एकच अनामिक हुरहूर आणि तगमग सतत चाललेली असते की, मी इथे या अवस्थेतून जात असताना, तिथे तुला माझी थोडीतरी जाणीव असेल का, हा प्रश्न मला आतून पोखरतोय. माझ्या मनाची ही अवस्था, ही अस्वस्थता तुझ्यापर्यंत पोहोचत असेल का? की तू तुझ्या विश्वात अगदी सुखात आणि माझ्या विचारांशिवाय जगत आहेस? भावनांचा हा कल्लोळ आणि ही वेदना कधीतरी तुला कळेल, याच एका आशेवर मी रोज स्वतःला सावरत आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट