तुझ्या सुखासाठी... ❤️
तुझ्या सुखासाठी मी स्वतःला तुझ्या आयुष्यातून वजा केलं खरं, पण या वजाबाकीने माझ्या मनातील तुझी जागा शतपट वाढवली आहे. एक एक पाऊल मागे घेताना वाटलं होतं की, विरहाची ही शांतता मला सांभाळून घेईल, पण उलट तुझ्या आठवणींचा कोलाहल आता अधिकच तीव्र झाला आहे. आता तर स्वतःच्याच सावलीची भीती वाटू लागली आहे, कारण डोळे मिटले तरी समोर फक्त तुझाच चेहरा येतो. घरात वावरताना, आई किंवा ताईशी बोलताना अचानक गळ्यात शब्द अडकतात, अन् भीती वाटते की माझ्या ओठांवरून नकळतपणे तुझं नाव निसटून जाईल आणि माझं हे गुपित जगासमोर उघड होईल. हाच थरकाप लपवण्यासाठी मी आता शब्दांना कुलूप लावलं आहे, अगदी अबोल झालो आहे. पण बाहेरून पसरलेलं हे मौन माझ्माया आतल्या वादळाला कसं शमवणार? ओठ शांत आहेत, पण मनाच्या गाभाऱ्यात मात्र अखंड, एकसुरी फक्त तुझ्याच नावाचा जप सुरू आहे. मी जितका तुझ्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतोय, तितकाच अधिक तुझ्या आठवणींच्या गर्द विळख्यात अडकत चाललो आहे. हे कसलं अंतर आणि हा कसला विरह, जिथे तू सोबत नसूनही श्वासाश्वासात फक्त तुझीच उपस्थिती जाणवते आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂