प्रवास... ०१/१०/२०२२

आपली इच्छा असो वा नसो, पण कुठंतरी थांबावच लागतं. कधी कधी ज्या विचारातून, जे काही सुरू केलेलं असतं, नेमकं तसं अगदी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. मग अशावेळी जे काही घडतंय, त्यापेक्षा ते आपल्या मनासारखं घडत नाहीये, याचा आपल्याला खूप त्रास होत असतो. सारं काही नको नकोस वाटत असतं, स्वतःचा ही तिटकारा येत असतो. "याचसाठी केला होता अट्टाहास".?? हा एकाच प्रश्न सतत आतल्या आत मन खात असतो. शेवटी एक मात्र खरंय, आपली इच्छा असो वा नसो, पण सुरु केलेला प्रत्येक प्रवास हा कुठेतरी थांबतोच.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..