Tattoo
आज महिन्याचा आणि वर्षाचा शेवटचा दिवस. सकाळपासूनच सगळीकडे संध्याकाळ कशी, आणि कुठे घालवायची, याच नियोजन सुरू होतं. मला माहित होतं की माझ्या घराला माझ्याशिवाय कुणीच नाही, म्हणून मी माझा 31st माझ्या घरासोबत साजरा करायचं ठरवलं होतं. तसा गेल्या काही वर्षांपासून माझा हाच बेत जवळपास ठरलेलाच, तोच यंदाही.! माझं काम आवरल्यावर, दुपारच्या वेळी कोर्टासमोरून जात असताना, कोपऱ्यावरच्या टपरीवर मी नेहमीप्रमाणे चहासाठी थांबलो. हवेत तसा दिवसभर गारठा जाणवत रहायचा, त्यामुळे अधेमध्ये सतत चहा प्यावासा वाटायचं. टपरीवर गेल्यावर वडापाव खाल्ला नाही, असं कधीच होत नाही, म्हणून मग सोबतीला एक वडापाव घेतलाच. चहा आणि वडापावचे आमदार, तोंडाच्या विधानसभेत शपथविधीला जाणारच, तितक्यात मला ती ओळखीची हाक ऐकू आली. हो.. बरोबर, तोच होता तो. नेहमीच इथंच आसपास गाठ पडणारा. तो आला, बाजूला बसला, आणि मी त्याच्या बोलण्यात हरवून, आमच्या गप्पा टप्पा कधी सुरू झाल्या, ते माझं मलाही कळलं नाही. नेहमीसारखच त्याला सहज न्याहाळत असताना, मला त्याच्या उजव्या हाताच्या करंगळी आणि मनगटाच्या मधल्या भागावर काहीतरी लिहलेलं दिसलं. तसं लगेचच मी त्याला ...