तसं काहीच नाही रे...💔
कधी नव्हे ते
भेटली #ती
किती काय काय
बोलली ती,
मी म्हणालो
मी वेडा गं
माझं तुझ्यावर
कित्ती #प्रेम गं,
ती म्हणाली
वेडाच रे तू
असलं तर कधीच माझ्या
स्वप्नातही नव्हतं,
मी म्हणालो
काय करावं मी
ते आता मला
सांग ना,
ती म्हणाली
मला विचारून प्रेम केलंस.?
आता तूच तुझं बघ ना,
#एकतर्फी 💔प्रेम तुझं,
त्यात माझा काय रे दोष,
उगाच उदास रडत बसतोस,
होऊन आठवणीत बेहोश,
न मागता मला माझ्या
प्रश्नांची #उत्तरं मिळाली,
उरलीसुरली #स्वप्नं माझी
कायमची मातीत मिळाली,
आजही नेहमीच अधेमधे
आमचं बोलणं होतं,
मी नॉर्मल वागतो
पण तिला चुकल्यासारखं होतं.!🎭
#अडगळ
#काल्पनिक_वगैरे