होय हिंदूच..

लहानपणी वाचनालयात गेलो की सर्वात आधी सामना वाचायचो. सामना हाती घेतला की नेहमीप्रमाणे माझी नजर सर्वात आधी 'ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक' या वाक्यावर स्थिरावायची. 

हिंदुत्व म्हणजे काय.? ते तेव्हाही माहीत नव्हतं, आणि आत्ताही माहीत नाहीये. हां पण एक मात्र तेव्हाही माहीत होतं, आणि आत्ताही माहीत आहे की मी #हिंदू आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर मी सामना वाचल्याचं आता मला आठवत नाही. पण माझ्यासाठी #हिंदुत्व म्हणजे बाळासाहेब होते, आणि नेहमीच राहणार.! 

किती ज्वलंत आणि जिवंत होते बाळासाहेबांचे विचार,

त्यांचा शब्द न शब्द होता हिंदुत्वाचा धगधगता अंगार.!🎭

#होय_हिंदूच 🙏🚩

(सौजन्य:- शरदबुवा महाराज मिरजकर)

लोकप्रिय पोस्ट