स्कॉलर
काही दिवसांपूर्वी आमच्या गल्लीतील एका स्कॉलर मुलाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. तपासाअंती कुठेही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवलेली अथवा इतर काही कारण निदर्शनास आलं नाही. त्यानं असं का केलं.? याचं कारण आता त्याच्यासहीत कायमचं लुप्त झालेलं होतं. पुढल्याच दिवशी एका वर्तमानपत्रात, एका छोट्याशा कोपऱ्यात, ''महाविद्यालयीन तरूणाची गळफास लावून घेऊन आत्महत्या'' इतकीच बातमी आली होती. आता हे सगळं काही मला इथं सांगावसं वाटण्याचं कारण इतकंच की, ही दुर्घटना घडल्यानंतर जेव्हा सांत्वनपर भेट द्यायला आणि आधाराचे चार शब्द बोलायला म्हणून जेव्हा मी त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा तिथं माझ्या कानावर पडलेलं एक वाक्य. जवळपास त्याच्याच वयाची ती सगळी मुलं होती, एका बाजूला घोळका करून थांबली होती, आणि त्यांच्या चर्चेचा विषय होता की, अशी स्कॉलर मुलं जर आत्महत्या करायला लागली, तर मग आपल्यासारख्यांनी काय करायला हवं.? आपण तर मग जगायला, किंबहुना जन्माला यायच्या ही लायकीचे नाहीये. तेव्हा सहज मनात विचार येऊन गेला की या घोळका करून थांबलेल्या मुलांना नेमकं असं काय समजलं आहे की ती मुलं असा विचार करत आहेत, आणि त्या मृत झालेल्या मुलाला ही असं नेमकं काय कळालं होतं की, त्याने असं टोकाचं पाऊल उचललं असेल.!?🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂