जीव हा... ❤️
माझा प्रत्येक दिवस केवळ तिच्याच आठवणींच्या सावलीत सुरू होतो आणि त्याच आठवणींच्या गर्द अंधारात संपतो. रात्रभर कित्तीतरी उशीरापर्यंत मी तिच्या आठवणीत या कुशीवरून त्या कुशीवर होत तळमळत राहतो. माझ्या मनाचा प्रत्येक कोपरा फक्त तिच्याच विचारांनी व्यापून गेला आहे. पण कधीकधी अचानक मनात एक शंका दाटून येते की, जशी ती माझ्या श्वासाश्वासात भिनलेली आहे, तशीच कधी माझीही आठवण तिच्या मनात डोकावत असेल का.? मी ज्या तीव्रतेने तिच्यासाठी तळमळतो, त्या तीव्रतेचा एक छोटासा अंश तरी ती कधी अनुभवत असेल काय.? हाच एक विचार माझ्या शांत चाललेल्या दिवसाला अचानक अस्वस्थ करून सोडतो, आणि जीव विनाकारण व्याकुळ होतो. तिच्या मनात माझ्याबद्दल काय चालले असेल, हा प्रश्न एखाद्या न सुटणाऱ्या कोड्यासारखा मला रात्रंदिवस सतावत राहतो. आणि उत्तर मला माहीत असूनही, तिने माझी आठवण काढावी ही एकच वेडी आशा मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात जिवंत राहते, आणि मला अधिकच हतबल करून जाते.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂