शेवटी एकतर्फीच.. ❤️‍🩹🫂

एकटाच बसून मोबाईलच्या स्क्रीनकडे तासन्तास बघत राहतो, बोटं मेसेज टाईप करायला जातात पण एक अनामिक भीती तिथेच थांबवून धरते. मनात विचारांचा नुसता कल्लोळ माजलाय, की माझा एक साधा मेसेज तिला आनंद देईल की तिचा राग आणखी वाढवेल? मला काय हवंय हे माझं मला स्पष्ट ठाऊक आहे, आणि कदाचित माझ्या मनातली ही तगमग तिच्यापर्यंत केव्हाच पोहोचली आहे. पण सगळ्यात जास्त मन तिथे खातं, जिथे मला जाणीव होते की माझं तिच्यावर असणारं प्रेम आणि तिची मला असणारी ओढ कदाचित एकतर्फीच आहे. मी जितका तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, तितकीच ती माझ्यापासून लांब पळतेय असं मला वाटत राहतं. माझी हीच हतबलता मला आतून पोखरतेय, कारण तिला गमावण्याची भीती आणि तिला मिळवण्याची तीव्र इच्छा या दोन्हीच्या कात्रीत माझा जीव अडकला आहे. शेवटी तिच्यासाठी टाईप केलेला तो मेसेज तिला न पाठवता तसाच डिलीट करतो आणि एका शांत, न बोललेल्या संवादाची वेदना मनात घेऊन पुन्हा गप्प बसतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट