हवाहवासा अवकाळी... ❤️
आता आमच्यात कायमस्वरूपी अबोला असला तरीही तिच्या आठवणींचा गारवा माझ्या मनात आजही तसाच जिवंत आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीत ती माहेरी येईल की नाही, हे मला ठाऊक नाही. पण तिच्या येण्याशी जोडलेलं या अवकाळी पावसाचं गणित माझ्या मनाला अजूनही वेड लावतं. आमची ओळख झाल्यापासूनचा हा एक अजब नियमच बनलाय. ती आली की किंवा ती येईल त्या दिवशी हमखास पाऊस येतोच. म्हणूनच आज जरी आमचा संवाद तुटलेला असला, तरी तिची वाट पाहण्यात एक वेगळीच नशा आहे, मजा आहे. ती आल्यावर नेहमीप्रमाणे लपून-छपून तिला पाहणं आणि त्या जुन्या, सुंदर दिवसांच्या आठवणींमध्ये हरवून जाणं मला आजही हवंहवंसं वाटतं. तो उन्हाळा, तो अवकाळी पाऊस आणि तिच्या आठवणींचा तो सुगंधी सडा.! या सगळ्यात चिंब भिजून स्वतःला विसरून जाण्यात जी मजा आहे ना, ती मला जगातील इतर कोणत्याही संवादापेक्षा कितीतरी पटीने अधिक मोठी आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂