नातं मैत्रीचं... ❤️

आपल्या या तथाकथित प्रगतीशील समाजाने नात्यांचे वर्गीकरण करण्यासाठी फक्त नर आणि मादी एवढे दोनच कप्पे तयार करून ठेवले आहेत. त्यापलीकडे जाऊन माणसाला निव्वळ 'माणूस' म्हणून पाहण्याची, समजून घेण्याची ना या समाजाची इच्छा आहे, ना त्यांची मानसिक कुवत. दोन भिन्न लिंगाच्या व्यक्तींमध्ये शारीरिक आकर्षणापलीकडेही एक वैचारिक, भावनिक आणि निखळ बंध असू शकतो, हे स्वीकारायला ही संकुचित मानसिकता तयारच होत नाही. मैत्रीसारखं अत्यंत पवित्र, सुंदर आणि अपेक्षाविरहित नातं सुद्धा या दळभद्री मानसिकतेच्या विळख्यातून सुटू शकलेलं नाही, हे या काळाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. जेव्हा जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी केवळ जीवाभावाचे मित्र म्हणून एकमेकांचा हात धरतात, तेव्हा हा समाज त्यात निखळ मैत्री शोधण्याऐवजी आपल्या विकृत नजरेने वासना आणि संशयाचे रंग भरू लागतो. समोरच्या व्यक्तीच्या भावनांची खोली मोजण्याची ताकद नसलेली ही माणसं, प्रत्येक नात्याला फक्त लिंगाच्या चौकटीतच तोलतात. अशा या बौद्धिक दारिद्र्य असलेल्या समाजात, नात्यांमधील निखळता टिकवून ठेवण्यासाठी मनाचा जो मोठेपणा लागतो, तो या गर्दीत हरवून गेला आहे, हेच आजकालच्या या so called पुढारलेल्या समाजाचे कटू वास्तव आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट