वणवा... ❤️‍🩹

यंदाच्या उन्हाळ्याने शरीराची लाहीलाही केली आहे आणि असह्य उकाड्यामुळे घराबाहेर पाऊल टाकणे देखील अशक्य झाले आहे. पंखा आणि कुलरच्या हवेत बसूनही अंगाची आग शमत नाही, अशी भयानक परिस्थिती आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आकाशात जमा होणारे काळेभोर ढग उन्हाच्या तडाख्यापेक्षा जास्त छळत आहेत. ते ढग पाहून दररोज मनात आनंदाची लहर उमटते आणि वाटते की, आता तरी मुसळधार पाऊस पडेल आणि या त्रासातून सुटका होईल. पण प्रत्येक संध्याकाळ फक्त एका कोरड्या आशेवर संपते आणि पावसाचा एक थेंबही जमिनीवर पडत नाही. निसर्गाचा हा खेळ पाहून खरोखरच असे वाटत आहे की, हा पाऊस सुध्दा खूप माणसाळला आहे. या पावसाला सुध्दा माणसाच्या 'फक्त आणाभाका घ्यायच्या आणि वेळप्रसंगी हुलकावणी द्यायची' या वाईट सवयीची लागण आता या पावसालाही झाली आहे. तो रोज आशेचे नवे जाळे विणतो, आपल्याला झुलवत ठेवतो आणि शेवटी आपल्या पदरात निराशा टाकून निघून जातो. आता या कोरड्या ढगांच्या गर्दीने त्या अंगाची लाही लाही करणा-या उन्हापेक्षाही जास्त मनाला थकवून सोडले आहे, जिथे रोज आशेचा अंकुर फुटतो आणि रोजच तो कोमेजून जातो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट