मनातलं... ❤️
माझ्या प्रिय बंधूंनो आणि (एक सोडून) बाकी सगळ्या भगिनींनो...
मी इथं व्यक्त होणं हा माझ्यासाठी केवळ एक संवाद आहे, स्वतःशी आणि तुमच्याशी साधलेला. माझ्या मनात येणारे विचार, भावनांचे तरंग मी शब्दांत उतरवतो. कारण या शब्दांशिवाय इतर कुणीही मला इतक्या मायेनं आणि प्रेमाने जवळ घेतलेलं नाहीये. या शब्दांशिवाय मला माझ्या मनाचा कोपरा रिकामा वाटतो. इथं लिहीत असताना माझे विचार प्रत्येकाला पटतील किंवा आवडतीलच असं नाही, कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण एक गोष्ट मात्र अगदी मनापासून खरी आहे की, माझ्या या लहानशा, अगदीच किरकोळ अशा लिखाणामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणाला त्रास देण्याचा माझा हेतू कधीच नसतो. हे तर निव्वळ मनाच्या गाभाऱ्यातून आलेलं #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂आहे, जे मला इथं मांडायला आवडतं. नकळतपणे कधी माझे शब्द चुकले, तर ती माझी मानवी मर्यादा समजा. माझ्या या प्रवासात जर काही उणिवा जाणवल्या, तर मोठ्या मनाने मला समजून घ्या आणि सांभाळून घ्या.!🎭
जय हिंद.. जय महाराष्ट्र