'शो-पीस' 💔

आजकालची बरीचशी नाती ही केवळ आणि केवळ एका मुखवट्या सारखी झाली आहेत. आपण समोरच्याला अगदी मनापासून आपलं मानतो, त्याच्या सुखात खरोखर आनंदी होतो. पण कालांतराने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागते की, त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपलं स्थान काय आहे..? तर फक्त त्याच्या यशाचा, त्याच्या सुखाचा आणि त्याच्या तथाकथित 'प्रगतीचा' एक मूक प्रेक्षक असणं..! त्यांना त्यांच्या आयुष्यात आपण हवे असतो, पण ते आपल्यावरील प्रेमापोटी किंवा आपुलकीपोटी नव्हे, तर फक्त त्यांचं आयुष्यं किती छान, किती 'परफेक्ट' चाललं आहे, हे आपल्याला दाखवण्यासाठी. आपण त्यांच्या त्या झगमगाटी दुनियेला कौतुकाची दाद द्यावी, एवढ्यापुरताच आपला वापर केला जातो. त्या पलीकडे जाऊन जेव्हा आपल्या मनाचा, आपल्या अस्तित्वाचा किंवा आपल्या सुख-दुःखाचा विचार येतो, तेव्हा तिथं फक्त एक शून्य उरलेलं असतं. आपण मात्र वेड्यासारखे समोरच्याला आपल्या आयुष्याचं केंद्रस्थान बनवून ठेवतो. पण त्यांच्यासाठी आपण फक्त एक 'शो-पीस' किंवा त्यांच्या सुखाच्या प्रदर्शनात टाळ्या वाजवणारे एक माध्यम असतो. ज्या क्षणी त्यांच्या आयुष्यातील तो देखावा संपतो किंवा त्यांना नवीन प्रेक्षक मिळतात, त्या क्षणी आपलं असणं, ना असणं त्यांच्यासाठी एकसारखं होऊन जातं. हे जेव्हा आपल्याला उमजतं, तेव्हा मनाला होणाऱ्या वेदना खूप खोल असतात. आपण ज्यांच्यासाठी उपलब्ध राहिलो, त्यांनी आपल्याला फक्त एक पर्याय म्हणून वापरलं, ही जाणीव मनाला आतून पोखरून काढते. पण या सगळ्या आभासी नात्यांच्या जत्रेत एक गोष्ट मात्र नक्की शिकायला मिळते, ती म्हणजे प्रत्येकावर भरभरून प्रेम करताना स्वतःचं अस्तित्व गहाण ठेवायचं नसतं. जोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात केवळ त्यांच्या सुखाचे साक्षीदार बनून राहू, तोपर्यंत आपली किंमत कधीच होणार नाही. म्हणूनच, अशा मुखवटे घातलेल्या लोकांपासून योग्य अंतरावर राहून, स्वतःच्या शांततेला आणि स्वाभिमानाला प्राधान्य देणं, हेच एक चांगल्या प्रकारचं #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.!🎭

लोकप्रिय पोस्ट