शेवटचा निरोप... ❤️‍🩹🫂

कधीकधी आयुष्यात नाईलाजाने एका अशा वळणावर यावं लागतं, जिथे कित्येक वर्षांपासून काळजात जपलेल्या एखाद्या जिवलगाचा, एखाद्या आवडत्या स्वप्नाचा हात ही नाईलाजाने का होईना, पण सोडावाच लागतो. ते स्वप्न पूर्ण न झाल्याच्या दुःखापेक्षा, त्या आभासी दुनियेतून बाहेर पडायला आपण खूप उशीर केला, ही जाणीव मनाला आतून पोखरत राहते. स्वप्नाचा पाठलाग करताना निसटून गेलेला वेळ आणि गमावलेले सुवर्णक्षण आता कधीच परत येणार नाहीत, ही रुखरुख शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील. पण जुनी स्वप्नं धुळीस मिळाली असली, तरीही थबकलेलं आयुष्य पुन्हा सुरू करावंच लागतं. आता इथून पुढे माझ्या त्या एकमेव स्वप्नाला फक्त डोळे मिटल्यावर येणाऱ्या आठवणीं पुरतंच मर्यादित ठेवून, वास्तवाच्या या खडतर जमिनीवर पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची हिंमत मला गोळा करायची आहे, करावीच लागणार आहे.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट