परिचित अनोळखी...
तिचं माझा प्रत्येक शब्द वाचणं आणि त्यावर तिचं हे निशब्द राहणं, आता मला एखाद्या कधीही न सुटणाऱ्या कोड्यासारखं वाटतंय. जर माझ्या शब्दांतल्या संवेदना तिच्या काळजाला भिडत नसतील, तर मग त्या काळजातल्या शाईला आणि कागदावरच्या शब्दांच्या वाट्याला येतो, तो फक्त कोरेपणाच. प्रतिसादाशिवाय केलेलं वाचन म्हणजे शब्दांची केवळ एक औपचारिक ओळख ठरतेय. माझ्या भावनांच्या प्रदर्शनापेक्षा मला तिच्या एका शब्दाची, एका खुणेची जास्त ओढ आहे. कारण तिच्या प्रतिसादाशिवाय माझं हे मांडलेलं सगळं "शब्दजग" आता मलाच परकं वाटू लागलं आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂