समझो ना... कुछ तो समझो ना... ❤️🩹🫂
मला खरोखरच एक गोष्ट समजत नाहीये की, माझे हे अत्यंत साधे आणि किरकोळ वाटणारे शब्द वाचून तुला इतका त्रास का बरं होतो आहे, की तू मला माझं लिखाण बंद करायला सांगते आहेस. जर या शब्दांमागे तुझा छळ करण्याचा किंवा तुला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नसेल, तर मग तुझ्या मनात एवढी अस्वस्थता का निर्माण होते.? तूच एकदा शांतपणे, डोळे मिटून स्वतःच्या मनाला विचारून पहा ना की, तू मला आजवर कधी अशी कठोर वागणूक दिली आहेस का.? तू कधी माझ्या भावनांचा अनादर करून माझ्याकडे अशा प्रकारे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहेस का.? तुला तर चांगलंच ठाऊक आहे की माझं तुझ्यावर कित्ती प्रेम आहे, या जगात तुझ्याइतकं दुसरं कोणीही माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, हे माहीत असूनही तू कधी माझी अशी उपेक्षा करत आली आहेस का.? जर या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘नाही’ अशी असतील, जर तू माझ्याशी कधीच वाईट वागली नसशील, तर मग माझ्या या किरकोळ लिखाणाचा तुला त्रास कसा बरं होऊ शकतो.? जेव्हा मनात कोणताच खोट नसतो, जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला मनापासून जपलेलं असतं, तेव्हा त्याचे शब्द टोचण्याऐवजी त्यातली काळजी दिसायला हवी. पण तरीही जर तुला या लिहिण्याने त्रास होत असेल, तर याचा अर्थ एकतर तू माझ्या भावनांना अजूनही नीट समजू शकलेली नाहीस, किंवा तुझ्या मनात कुठेतरी काहीतरी अस्वस्थ करणारं दडलं आहे, जे तुला सतत तू माझी अपराधी असल्याची जाणीव करून देत आहे. माझं लिखाण हा तर फक्त माझ्या मनातल्या भावनांचा एक छोटासा आरसा आहे, ज्यामध्ये मला केवळ तुझी आणि माझी सोबत पाहायची आहे. मी जेव्हा जेव्हा लिहितो, तेव्हा त्यात केवळ तुझाच विचार असतो, मग अशा वेळी त्यात तुला त्रास देईल असं काही असणं कसं शक्य आहे.? जर तू आजवर मला कधीच दूर लोटलं नाहीस, माझ्या प्रेमाचा कधीच अवमान केला नाहीस, तर या शब्दांकडे एक साधी भावना म्हणून तू का बरं पाहू शकत नाहीस.? तू अगदी माझ्या डोळ्यांसमोर असूनही तुझ्याविना जगण्याचं हे दुःख मी वर्षानुवर्षे सहन करतो आहे, याची थोडीतरी जाण आणि माझ्या एकतर्फी प्रेमाची कदर तू करायला हवी गं. खरं तर, या किरकोळ शब्दांमधील गूढ आणि त्यामागची माझी तळमळ ज्या दिवशी तुला समजेल, त्या दिवशी तुला या लिखाणाचा त्रास होणार नाही, उलट त्यातलं अथांग प्रेम जाणवेल. म्हणूनच म्हणतो, मनावरचा हा ताण बाजूला ठेव आणि माझ्या या शब्दांकडे रागाने किंवा त्रासाने न पाहता, त्यात दडलेल्या माझ्या निखळ प्रेमाच्या भावनेने पहा, मग तुला यात अजिबात त्रास जाणवणार नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂