काळाची गरज... ❤️🩹🫂
आजकाल माणसाच्या शरीरातला प्रत्येक दोष तर यंत्रांना सापडतोय, पण मनातल्या भेगा मात्र अजूनही कोणत्याच स्क्रीनवर दिसत नाहीयेत. आपल्या आजूबाजूला आपल्याला सतत दिसणा-या कित्येक हसऱ्या चेहऱ्यांच्या आड किती अबोल किंकाळ्या गुदमरून पडल्या आहेत, याचा अहवाल अजून कोणत्याच मशीनकडे नाहीये. माणसाने या विज्ञानाच्या साहाय्याने माणसाच्या शरीराचे नकाशे वाचायला तर शिकवले, पण एखाद्या व्यक्तीच्या मनाच्या अंधाऱ्या खोल्यांचे दरवाजे उघडणे मात्र कोणत्याही तंत्रज्ञानाला जमलेलं नाहीये. कदाचित पुढची सर्वात मोठी क्रांती ही याच प्रकारच्या एखाद्या नव्या यंत्रांची असेल, जिच्यामुळे माणसाच्या न बोललेल्या वेदनांना योग्य वेळी वाचा फुटेल. आणि असं काहीतरी होणं काळाची गरज बनलं आहे. कारण आजकाल अनेक जीव आजाराने नाही, तर मनातलं न ऐकलं गेल्यामुळे, योग्य वेळी मानसिक आधार न मिळाल्यामुळे आपल्यातून कायमस्वरूपी हरवत चालली आहेत.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂