एल निनो वगैरे आणि बरेच काही... ❤️🩹🫂
यंदा त्या एल निनोची ज्या थाटात जाहिरात झाली होती ना, वाटलं की आता पावसाचं सरकारच बरखास्त होणार.
रोज नवे अंदाज, रोज नवी पत्रकार परिषद, रोज नवी भीती...
"बहुतेक यंदा पाऊस कमीच पडणार..!"
पण आपल्या पावसाने बहुतेक हे सगळे अहवाल फाईलमध्येच ठेवले, आणि थेट जनतेसमोर बहुमत सिद्ध करायला मैदानात उतरला.
पहिल्याच सत्रात असा विश्वासदर्शक ठराव जिंकला, की एल निनोचं विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात आलंय.
ज्यांनी रोज त्याची बाजू घेतली होती, ते आता "आमचं विधान चुकीच्या संदर्भात घेतलं गेलं..." असं म्हणत बचाव करत फिरताना दिसत आहेत. 🤣
एल निनोची अवस्था तर अगदी निवडणुकीपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड हवा केलेल्या, पण मतमोजणीला अनामत जप्त झालेल्या उमेदवारासारखी झालीय.
बाकी एक गोष्ट मान्य करावी लागेल की महाराष्ट्राचा पाऊस हा कुठल्याही सर्वेक्षणावर, एक्झिट पोलवर किंवा भविष्यवाणीवर चालत नाही, तो थेट निकाल जाहीर करतो. आणि यंदाच्या निकालात "एल निनो"चं डिपॉझिट जप्त आणि "पाऊस" पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी झालेला आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
(सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)