तुमच्या माझ्या मनातलं... ❤️🩹🫂
माझा हा ब्लॉग, इथं मांडले जाणारे विचार कदाचित प्रत्येकाला आवडतीलच असं नाही. कारण इथं गाजावाजा नाही, दिखावा नाही, तर आयुष्याच्या जखमांवरून अलगद फिरणारा शब्दांचा एक प्रेमळ हात आहे. इथली प्रत्येक ओळ ही कुणीतरी जगलेल्या, भोगलेल्या क्षणातून जन्माला आली आहे. इथल्या या शब्दांत तुम्हाला प्रामुख्याने प्रेम, विरह आठवणी, नियतीचे अजब खेळ आणि माणसांच्या कायमच्या निघून जाण्याची वेदना हेच विषय दिसून येतील. बहुतेक म्हणूनच ते फक्त लिहायचं म्हणून लिहिलेले कमी आणि प्रत्यक्षात जगलेले असे जास्त वाटतात. आणि म्हणूनच नकळतपणे तुम्हाला स्वतःशी, स्वतःच्या आयुष्याशी संवाद साधायला भाग पाडतात.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂