पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अगं... ऐक ना..

तुझी आठवण येत नाही असं काही नाही, पण दररोज उठून, मी सतत तुला तेच ते सार काही पुन्हा पुन्हा सांगणं हे ही बरोबर नाही. तुला आवडेल, ना आवडेल, तुला काय वाटेल, काय वाटत असेल, ही भीती पण असतेच ना गं.! कधी कधी आठवणींच्या एखाद्या गोड क्षणाने अचानक भरून आलेलं डोळे, तेव्हा तुझ्याशी खूप खूप खूप काही बोलावंस वाटणं, कधी कधी तुला पहायला, तर कधी तुझा आवाज ऐकायला माझं मन कावरबावरं होतं, या सा-या गोष्टींवर माझं नियंत्रण अजिबात नसतं. अचानक एखादा आठवणींचा झोका येतो, आणि मला अलगद त्याच्या कवेत घेऊन जातो, पण मी सतत तुला तेच ते सार काही पुन्हा पुन्हा सांगणं हे ही बरोबर नाही. तुला आवडेल, ना आवडेल, तुला काय वाटेल, काय वाटत असेल, ही भीती पण असतेच ना गं.! दररोज मला माझ्या सभोवती दिसणारे शेकडो चेहरे, थोडेसे ओळखीचे अन् कितीतरी अनोळखी, पण त्या सा-यांच्या गर्दीत तुला सतत शोधणा-या माझ्या मनाला कसं समजवावं, आणि भावनांना बांधून कसं ठेवावं, हे मला काहीच कळत नाही. कधी कधी सभोवताली दिसणा-या प्रत्येक व्यक्तीत जेव्हा तुझाच चेहरा दिसू लागतो, तेव्हा मी आनंदाने हसत असतो आणि मी एकटाच का हसतोय म्हणून माझ्या आसपासचे माझ्यावर हस...

त्याच्या_मनातलं

आज अचानकच हवेत उकाडा खूप वाढला होता. शरीराची लाही लाही होत होती. आणि अशातच आज कामानिमित्त मला अॉफिस सोडून बाहेर यायला लागलं होतं. तासाभरात काम आवरल्यानंतर मी बसची वाट पाहत थांबलो होतो. डेपोत फोन लावून चौकशी केली होती. बस यायला अजुन बराच वेळ होता. उन्हाच्या तडाख्याने तिथं थांबण नको नको झालं होतं. म्हणून मग जीवाला जरा गारवा वाटावा म्हणून बाजूच्या दुकानावर जाऊन ग्लासभर ऊसाचा रस पिऊन आलो. तितक्यात लांबून कुणीतरी मला हाक देत माझ्याकडे येत असल्याचं मला दिसलं. हो, अगदी बरोबर. तोच होता. आज खूप दिवसांनी आमची भेट झाली होती. बाकड्यावर थोडीशी जागा झाली होती, तिथं आम्ही दोघं अॅडजस्ट करून बसलो. अजूनही बस आली नव्हतीच. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तितक्यात त्याच्या हाताचे तळवे पाहत त्याने मला विचारलं. मित्रा., तुझा या हातांच्या रेषांवर विश्वास आहे काय रे.? मी त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि गप्प बसलो. तो ही माझ्याकडे पाहून मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला की., "एकमेकांचे हात हातात घ्यायचा योग कधी आला नाही, पण एकदा तिच्या हातावर काढलेली मेहंदी दाखवताना गंमतीने एकमेकांच्या हाताचे फोटो आम्ही एकमे...

तांदूळ..

रेशनिंगच्या तांदळाचा मोह काही केल्या सुटत नाही. ते मोठे मोठे थोडेफार पांढरे-काळपट शिजल्यानंतर फुगीर दिसणारे दाणे, त्यात शिजवताना टाकलेले मुगाच्या वा तुरीच्या डाळीचे काही दाणे.!! आहाहा... कमालीची लाजवाब चव..! कितीही महागडा तांदूळ आणून खाल्ला तरीही, जेवणाच्या शेवटी रेशनिंगच्या तांदळाच्या भाताचे दोन घास  खाल्ल्याशिवाय, जेवणं परिपुर्ण वाटतच नाही. रेशनिंगच्या धान्याची ही ओढ तशी जुनीच आहे. बालपणी रेशन दुकानाच्या लाईनीत थांबण्यापासूनच ती नसानसांत भिनलीय. आता रेशनकार्डावर रॉकेल तेल मिळायचं बंद झालं असलं तरी, आजन्म त्या रॉकेल तेलाचा वास कधीही विसरणार नाही, कारण तेव्हा पाच-सात लिटर रॉकेल तेल मिळालं तरी, निदान आठ पंधरा दिवस तरी आईचा स्वंयपाक करतानाच त्रास कमी व्हायचा. तिची कामं वेळेत व्हायची. स्टोव्ह पेटवताना आवळलेली ती चावी, मग त्यात भरलेली ती हवा, नंतर बर्नर मधून रॉकेल बाहेर येण्यासाठी केलेली पिन, आणि लगेचच काडी पेटवताच स्टोव्हचा येणारा तो भप्प असा आवाज. अजूनही नुसतं आठवलं तरी सगळं काही जसच्या तसं नजरेसमोर उभं राहतं.! 🎭 #आयुष्य_वगैरे #गंध_आठवणींचा

याला जीवन ऐसे नाव..

मरण यायला वयाचं काही बंधन नसतं. ते कधीही, कुठेही कसंही ते येऊ शकतं. कधी कधी तर असं वाटतं की, एखादी व्यक्ती मरणाच्या अगदी हातात हात घालून फिरते आहे. त्यांच्या बोलण्यात सतत..., अरे.., जो काय आहे तो आजचा दिवस, आत्ताचा क्षणच आहे. उद्या काय होईल कोण पाहिलंय.? आणि असं वागणारी, बोलणारी माणसंच एक दिवस अचानक आपल्यातून निघून जातात. हिरव्यागार झाडाची, हिरवीगार पानं ही कधी कधी अचानक गळून पडतात.!  #आयुष्य_वगैरे

कुबेराचा खजिना..

मनात आलेलं बरंच काही, ब-याचदा वेळेअभावी लिहायचं राहून जातं. पण कागदावर न उतरलेल्या, मनात घुटमळत असलेल्या त्या शब्दांची, बाहेर पडायची धडपड काही केल्या कमी झालेली नसते. मग कधीतरी एखाद्या निवांत क्षणी, स्वस्थ बसून असताना अचानकपणे सगळं सगळं काही आठवू लागतं. आख्खं आयुष्य दारिद्यात काढलेल्या एखाद्याला कुबेराचा खजिना सापडावा, तसं काहीसं मग तेव्हा वाटतं. स्वप्नंवत वाटणारी अशी ही श्रीमंती, कधीतरीच वाट्याला येत असली तरी, ते सुख अगदी जसच्या तसं नेहमीच शब्दांत मांडता येत नाही.!  #आयुष्य_वगैरे

#जुन्या_आठवणी

पुढला दिवस सुट्टीचा असला की आदल्या रात्री कधी कधी मुद्दामहून दोन चार जास्त भाक-या बडवल्या जातात. नाश्त्याला नेहमीच तेच ते उप्पीट पोहे खाऊन कंटाळा आला असला की, हा असा बेत ठरलेला असतो. मग त्या कांद्याने तेलात उडी मारल्या मारल्या घरभर पसरलेल्या सुवासाने पोटं पार खवळून जातात. कुणी याला तुकडं म्हणतं, तर कुणी भाकरीचं पोहे म्हणतं, पण जीभेचे असे चोचले पुरवायला खरंच बाकी कशानेही सर येत नाही. मस्तपैकी कांदा टोमॅटो, बाकी किरकोळ मसाले आणि वरतून थोडी कोथिंबीर पेरली की बस्स. थोडं ओलसर हवं असेल तर पाण्याचा किंचित शिडकावा, अथवा नुसतं वाफेवर ही काम होवून जात. अगदी असंच आदल्या रात्रीची एखादी भाजी शिल्लक असेल तर ती सुध्दा भाकरीच्या पिठात मिसळून, अगदी भाकरीप्रमाणेच थापटलेला, पण खरपूस भाजलेला एखादा #धपाटा सोबतीला थोडं दही आणि खर्डाही स्वर्गसुखाचा अनुभव देऊन जातो.! बहुतेक #जुन्या आठवणी ही अशाच असतात, फक्त अधेमध्ये त्यांना नव्याने #फोडणी देत जायचं असतं.!  #आयुष्य_वगैरे

स्पर्श..

कितीही आठवलं तरी, काहीच आठवत नाही आता. तुझा घरामधला वावर, तुझ्या हातातील बांगड्यांची किणकिण, त्या पैंजणातील निवडक अशा घुंगरांचा आवाज, धुणं भांडी झाल्यावर तुझ्या हातांना येणारा तो विशिष्ट मोहक सुवास, तासभर एकसारखं पाण्यामध्ये असल्यामुळे, पांढरे फटक पडलेले तुझे गोरे गोरे पान हात-पाय, त्या तशाच ओल्या गारेगार हातांनी, तुझं माझ्या गालांना स्पर्श करणं, आणि तुझा तो नेहमीच मला हवाहवासा वाटणारा असा स्पर्श ही..!!  कितीही आठवलं तरी, काहीच आठवत नाही आता.!  #आयुष्य_वगैरे #गंध_आठवणींचा

दिवास्वप्नं...!! २८/०५/२०२३

हे नेहमीच असं होतं, तुझ्या आठवणींचा एखादा डोह जणू, अन् माझ्या मनाची नौका त्यात सतत दोलायमान स्थितीत. तुझ्या आठवणींनी कुठल्याही क्षणी हक्कानं यावं, आणि माझ्या मनावर अधिराज्य गाजवावं अशा सा-या तुझ्या आठवणी. कधी कधी हा डोह शांत असतानाही, माझं प्रतिबिंब मला त्यात दिसत नाही, तिथं दिसतेस तर फक्त तू आणि तूच.! तुला तर माहीतीये, मग शांतपणे टक लावून एकसारखं पाहत असतो मी तुला, नेहमीप्रमाणेच! तुला अन् तुझा चेहरा पहायची माझ्या मनाची तृष्णा, मग भागतच नाही, तुला एकटक कितीही वेळ पाहिलं तरीही. तिथं आपलं सारं बोलणं डोळ्यांनी होतं, पण तुझं लाजणं आणि सतत नजर चोरणं न्याहाळत, मी माझी नाव, त्या डोहात अलगद हाकतच असतो. तेव्हा अधेमध्ये माझ्या नजरेला अचानक भिडणारी तुझी नजर, मला एखाद्या वादळासारखी भासते. मग अचानकपणे त्या डोहात उठतात तरंग, सगळं काही क्षणार्धात अस्पष्ट होऊनं जातं. दिवास्वप्न वगैरे.!

शाळेतल्या आठवणी... २८/०५/२०२२

इमेज
काल खूप वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत जाण्याचा योग आला. जुने दिवस आठवले. भरपूर वेळ शाळेच्या कट्ट्यावर बसून जे जे आठवतील ते प्रसंग पुन्हा जगत होतो. शाळेच्या आवारात फिरताना नजर सतत आजूबाजूला लिहिलेल्या सुविचारांवर जात होती. ते वाचत वाचतच सगळीकडे फिरलो. अधेमधे भिंतीवर दिसणारी महापुरुषांची चित्रं पाहून खूप मस्त वाटत होतं. हा इथं आपण अमुक इयत्तेत होतो, इथं अमुक इयत्तेत. या ठिकाणी बसून आपण नेहमीच डबा खायचो, इथं खेळायचो, प्रार्थनेच्या वेळी उभं रहायची ही आपली ठरलेली जागा, कवायत प्रकार करताना साथीला वाजणारं ते ढोलताशाचं संगीत, दररोज सकाळी मंदिरात होणा-या आरतीचा घंटानाद, दररोज सकाळी सकाळी मिळणारं ते चवदार सुगंधी दूध, इथं साचणा-या पावसाच्या पाण्यात आपण नेहमीच धिंगाणा घालायचो, शाळेत जाताना सर्वांनी चप्पला काढायची ती ठरलेली जागा आणि शाळा सुटल्यावर एकमेकांच्या चप्पला विस्कटून होणारा गोंधळ, असलं भरपूर भरपूर काही आठवत होतं.!! हे सारं  मनातल्या मनात आठवत आणि गालातल्या गालात हसत माझं फिरणं सुरूच होतं. नंतर हळूहळू पावलं वर्गाकडे वळली. वर्गात पाऊल टाकताक्षणी पहिल्यांदा कानात आवाज घुमला तो "ए...

मनातला पाऊस...! १५/०९/२०२२

हा पाऊस कधी कधी उनाड मुलासारखा वाटतो. घरची मंडळी याच्या बाल लीलांनी पार वैतागून गेलीयेत. आजूबाजूच्या परिसरात ही याची दहशत आहे. तसा हा खूप गोड आहे. पण सतत काहीतरी कांड करत असतो, म्हणून सारे याच्यावर जरा चिडूनच. तसं त्याच वयही ते काय, फारफार तर नाजूक हातांनी एखादा फटका देऊ आपण इतकंच, नाहीतर खूप जोरांनी ओरडू त्याच्यावर. म्हणून मग याला शिस्त लागावी, यासाठी वसतीगृह शाळेत खूप खूप खूप लांब धाडलयं. अथांग असा निळाशार समुद्र नेहमी उशाला असूनही तिथं त्याला करमत नाही. आपल्या माणसांच्या ओढीत त्याचा जीव सतत कावराबावरा होत असतो. मग अधेमध्ये तिथून पळ काढून घरी येऊन तो धिंगाणा घालून जातो, तो अवकाळी.!! मग तो असा वागायला नको म्हणून त्याला वर्षातून ठराविक दिवस घरी जायची मुभा दिली, तरीही तो जातो, ते धिंगाणा घालतच, आणि सुट्टया संपल्यावर वसतीगृहाकडे परतणं तर त्याच्या जीवावर येत. मग हात पाय बडवत, खूप जोरजोरांनी रडत, घरभर धिंगाणा घालत, नाईलाजाने तो जातोच, तो परतीचा पाऊस.!! अशी असते ही आपल्यांची ओढ, जवळ असताना आपलं लक्ष जात नाही अन् जीवघेणा दुरावा काही केल्या सोसवत नाही.!!🎭

हुंदका....! २४/०९/२०२२

तसं पहायला गेलं तर व्हिडिओ कॉलद्वारे अधेमध्ये त्यांची डिजिटल भेट सतत होत असते, तरीही प्रत्यक्ष भेटीची ओढ कधीच कमी होत नाही. अशावेळी थोड्या गप्पा टप्पा, कधी हलका फुलका विनोद, कधी पिठात माखलेले हात, तर कधी उकळी मारणारा चहा.,अशी किचनमध्ये तिची सुरू असलेली लुडबूड त्याच्या नजरेला पडायची. कधी कधी काहीही विषय नसताना ते तासनतास बोलायचे., अशावेळी त्याच्या अन् तिच्या चेहऱ्यावर एकसारखं, अविरत, एक हलकसं हसू, त्यांचं बोलणं संपेपर्यंतच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कायम असायचं. वर्षातून एकदा दोनदा कधीतरी मग त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग यायचा. दोन पाच मिनिटांचीच असायची ती भेट वगैरे. इथं पण तीच एकसारखी बोलायची, तो टक लावून तिच्याकडे पाहत असायचा. ती नजरेला नजर देणं टाळायची, सतत आजूबाजूला पाहत असायची, अधेमध्ये लाजून मस्त हसायची. हाणला पाहिजे तुला.., इतका टक लावून काय बघतो रे.?? तिचं हे बोलणं ऐकून तो हसून विषय टाळायचा. मग ती परतीच्या वाटेवरती निघाली की का कुणास ठाऊक, पण त्यांच डोळं अचानक भरून यायचं, भर गर्दीत, शेकडो माणसांत हुंदका दाटून यायचा, तिथं त्या गर्दीत हे सारं लपवणं त्याला खूप जड जायचं. त्याच्या...

सुखाची बाजू...! २६/११/२०२२

कुणीतरी जवळचं आपल्याला त्याच्या अडीअडचणी, सतत येणार अपयश वगैरे सांगत असतं. आपणही ते सारं काही अगदी मनापासून ऐकत असतो. त्याच्या खांद्यावर हात टाकून, त्याला आधार द्यायचा प्रयत्न करत असतो, त्याला सांगत असतो की, हे ही दिवस जातील, हताश होऊ नकोस. तरीही समोरची व्यक्ती exactly जे काही feel करतीय ना, नेमकं तेच आपण feel नाही करू शकत, हे कुठंतरी आपल्याला पक्कं ठाऊक असतं. त्याच्या लाईफ मध्ये काय सुरू आहे, त्यातलं चांगलं वाईट हे त्यांच त्यालाच ठाउक असतं. खरंच त्याची नेमकी मनस्थिती कुणीही समजू शकत नाही. अशावेळी त्याला आधार देण्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो, ते म्हणजे दोन चार आश्वासात्मक आणि तू एकटा नाहीयेस, आम्ही आहोत सोबत सदैव, याची जाणीव करून देणारे शब्द.! खरंच, एक गोष्ट मात्र खरी की, कुणाच्याही आयुष्यात शंभर टक्के वाईट कधीच घडत नाही... आपल्या शेकडो दुःखांना पुरून उरेल, अशी एक सुखाची बाजू आपल्या सर्वांना मिळालेली असते. फक्त आपण ती शोधली पाहिजे, मनसोक्त जगली पाहिजे.!  #आयुष्य_वगैरे

विरंगुळा...! ०४/०१/२०२३

रोजच्या जगण्या पलीकडेही आपल्या मनाचं एक भावविश्व असतं. त्या भावविश्वात काहीतरी हरवण्या सापडण्याचे प्रसंग सतत आपल्या सोबत घडत असतात. आपल्या प्रत्येक दिवसाच शेड्युल तसं ठरलेलंच असतं, आणि शेड्युल म्हटलं की अगदी घड्याळाच्या काट्यावर नेमून दिल्याप्रमाणे तोचतोचपणा आलाच. मग या सा-यातून विरंगुळा म्हणून, एक हक्काची मधली सुट्टी म्हणून, फक्त आपला असा एक क्षण, अधेमध्ये सतत आपल्या वाट्याला येत असतो. तो क्षण म्हणजे कुणाचीतरी अचानक येणारी आठवण, क्षणार्धात आपल्या डोळ्यांसमोर उभा राहणारा त्याचा/तिचा चेहरा, आणि नकळतपणे आपल्या चेहऱ्यावर खुललेलं हसू.! खरंच, सर्व काही विसरायला लावणारा, बेभान होऊन हरवून जायला लावणारा, असा एक तर वेडावणारा विरंगुळा माणसाला हवाच, नाहीतर माणसं ठार वेडी होतील.!  #आयुष्य_वगैरे

#प्रेम_आई 💓

दररोज सकाळी कामावर जाताना, मला आईला हसताना पहायला जाम भारी वाटत. कधी कधी काहीच कारण नसतं, किंवा कधी कधी मुद्दामहून मीच काहीतरी बोलून, वागून वगैरे तिला हसायला भाग पाडतो. मी आतल्या रूममध्ये लुडबुड करीत असतो, आणि आई रूमच्या चौकटीला बिलगून, अलगद थोडीशी मान झुकवून एकटक माझ्याकडे बघत असते आणि एकसारखी कित्ती गोड हसत असते. तिच्या डोळ्यांतला तो आनंद काय वर्णू.११ लय म्हणजे लय भारी वाटतं तेव्हा. तेव्हा जाम भारी लाजते ती, प्रेमाने दोन चार शिव्याही देते तेवढ्या सकाळी सकाळी, पण सकाळी घरातून बाहेर पडताना, आईला तसं खळखळून हसताना पाहिलं की, कधी कधी सगळ्या दिवसाच, तर कधी कधी आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटतं.! #प्रेम_आई 💓 #आयुष्य_वगैरे

किनारा.... १०/०१/२०२३

किनारा.. किना-याचं आयुष्य.!  आतुरतेने वाट पाहत, विस्तीर्ण असे बाहुपाश कायम पसरलेले, त्या एका लाटेच्या प्रतिक्षेत.! लाट येते, लाट जाते. हे अविरत सुरू असतं. नेहमीच किना-याच्या वाट्याला येणारी, अगदी काही मोजक्याच क्षणांची ती लाट, तरीही त्या भेटीची ओढ कधीच कमी होत नाही. कुणी म्हणतं.., वेडा आहे हा किनारा, त्याच्या मिठीत ती लाट, कधीच नाही सामावणार.! पण किनारा मात्र आपल्याच विश्वात रमलेला. लाट धडकून धडकून भेगा पडल्या, तुकडे तुकडे झाले तरी बेहत्तर, पण किना-याला कोरडेपणा नकोय.!  #आयुष्य_वगैरे #एकतर्फी

वेड...!! ०९/०१/२०२३

इमेज
प्रेम तिनेही केलं, प्रेम त्यानंही केलं. वेड तिच्यातही होतं, वेड याच्यातही होतं. पण सत्यानं केलेलं प्रेम हे सर्वस्व उधळून, सारं काही विसरून केलेलं होतं. तर श्रावणीचं प्रेम सत्य स्वीकारून, आपल्या असलेल्या एकतर्फी प्रेमासाठी स्वतच अस्तित्वच विसरून, नाकारून, सगळं काही सांभाळून  ठेवणारं, हातचं काहीही निसटू न देणारं असं होतं. शेवटी एक मात्र खरं की, एखाद्या निशा साठी वेडे असणारे सत्यासारखे गल्लोगल्ली खूप सापडतील, पण एखाद्याचं आपल्यावर #प्रेम नसतानाही, फक्त आणि फक्त त्याच्यावरच प्रेम करणारी, ते जपणारी, #श्रावणी फारच दुर्मिळ.! आपल्यावर असं वेड्यासारखं प्रेम करणारं, कुणी तरी आपल्या वाट्याला यायला खरंच खूप नशीब लागतं.! #आयुष्य_वगैरे  #एकतर्फी

आली माझ्या घरी ही दिवाळी...!! १७/१०/२०२२

आजूबाजूला भाजणीचे, तळणाचे वगैरे सुवास दरवळू लागले आहेत. पहिल्या फेरीत करंज्या आणि चकलीचा जास्त जोर आहे, असं सध्या तरी दिसतंय. हळूहळू बाजारपेठा ही गजबजू लागल्या आहेत. रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या रंगांच्या मनमोहक आकाश कंदीलांच्या माध्यमातून, मार्केटचा सगळा परिसर तर अगदी झगमगत्या तारांगणासारखा भासतो आहे. ठिकठिकाणी किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती घडवल्या जात आहेत, तिथेच, अगदी बाजूलाच सैनिकांच्या फौजा तयार उभ्या आहेत, हत्ती, घोडे, उंट, वाघ, हरीण, मगर मानवी वस्तीत अगदी निवांत बसलेले आहेत., हो.., #दिवाळी जवळ आलीय.!!🎭 #आयुष्य_वगैरे

आठवणी शाळेतल्या...! १०/१०/२०२२

आमची शाळा अगदी गावच्या वेशीला. शाळेला मैदान असं नव्हतंच. बरोबर शाळेसमोर एक हनुमान मंदिर, त्याचा सभोवतालचा परिसर हेच आमचं मैदान. शाळा अंगणवाडी, बालवाडी वगैरे ते सातवीपर्यंत. नशीबाने ही सारी वर्षे मी तिथंच शिकलो. ब-यापैकी सगळी वर्षे माझी शाळा सकाळ सत्रातच होती. आधी दैनंदिन परिपाठ वगैरे आणि मग सातला पहिला तास वगैरे सुरू. या सा-यात मधल्या सुट्टीचं नेहमीच कौतुक असायचं. घरून डबा तर आणलेला असायचाच, पण तो डबाही पटकन खाऊन शाळेच्या कोपऱ्यावरच्या जग्गूच्या दुकानातून चार आठ आण्याचा खाऊ आणून खायची मजा काही औरच. कधी वटाणे फुटाणे तर कधी चिंचेचा गोळा घेऊन तास सुरू असतानाच चरत बसायचो. एखाद्याच्या वटाणा फुटाणा खाल्याचा बहाणा साधून, कुणीतरी संधीसाधू डाव साधायचा आणि पुर्ण वर्गात दुर्गंध सोडायचा. हिरोशिमा नागासाकी सारखा बॉम्ब पडल्यासारखी अवस्था व्हायची तेव्हा वर्गाची. कधी कधी नकळत मास्तर ही नाकाला हात लावायचा. मग वर्गातील एखादा हुशार सीआडी नाकाचा नेमका कुणी दुर्गंध पसरवलाय ते सांगायचा, तेव्हा वर्गात एकच हशा पिकायचा. तर अशी ही आठवणीतल्या शाळेची एक छोटीशी आठवण.!! #मधली_सुट्टी 💓

सोयाबीन....! ०९/१०/२०२२

या दिवसात एव्हाना सोयाबिनची काढणी आणि मळणी झालेली असायची. तरीही बाजारात नेऊन विकण्याआधी थोडंसं उन खायला सोयाबीन अंगणभर पसरलेलं असायचं. गाढव आणि उडंग्यावनी फिरणारी जनावरं यांनी सोयाबिनात तोंड मारू नये, म्हणून मी, भाऊ आणि शेजारची मित्र यांना शाळेतून परतल्यावर दिवसभर सोयाबीन राखणीचं काम असायचं. आई बा अन् आज्जा शेताकडे गेलेलं असायचं. दिवाळी तोंडावर आलेली असायची. बा मिलमधलं काम बघून शेती बघायचा. त्याची लय वढाताण व्हायची, पण उधारी उसनवारी करून कसतरी तो घर चालवायचाच. हफ्त्याभरानं हळूहळू सोयाबीन बाजारात घेऊन जायचं. ते इकून पैला उधारी भागवायची. मग उरलेला पैसा प्रपंचाला लावायचा. तरीही कमी पडायचचं. पण तरीही आम्हा भावंडांची सगळी हौस व्हायची. मग एखादी दिवाळी आईबाची नव्या कपड्याविनाच जायची. एखादं जुनं पाताळ आई सणाला मिरवायची. बा सुद्धा एखादा जुनाच कडक ड्रेस इस्त्री मारून वापरायचा.! मळणी करताना त्यात मातीच तुकडं जास्त आहेत म्हणून बाजूला काढलेलं एखादं तोंड बांधून ठेवलेलं सोयाबिनचं पोत तसंच पडलेलं असायचं. दिवाळ सणानंतर त्याला जमेल तसं निवडून, साफ करून, ते बाजारात नेऊन इकून पुन्हा बरेच दिवस संसारगाडा आई...

आठवणींचा पाऊस..! ०९/१०/२०२२

आज खूप दिवसांनी त्याची भेट झाली. मध्यंतरी बराच काळ लोटल्याने, मला त्याला ओळखणं जड जात होतं. डोक्यावर आणि गालावर पांढ-या केसांच अतिक्रमण आता खूपच जास्त दिसून येत होतं, प्रत्येक भेटीगणिक हळूहळू कमी येणारं त्याच हसू मात्र प्रकर्षानं जाणवत होत. आजही तो थोडासा निराशच दिसत होता. नेहमीप्रमाणेच चहाच्या टपरीवर आम्ही बसलो होतो. मी काहीच बोलत नव्हतो, त्याला एकटक पाहत होतो. तितक्यात चहाच्या पहिल्या घोटाबरोबर तो बोलता झाला. दोन तीन दिवस झालं., आई खूप धडपडतीये रे., पप्पांना बोलल्यागत करते, पण नकळत मलाच बोलतेय असं वाटतं. सतत म्हणत असते की, अहो., ऐकलंत का.? आपण आधी राहत होतो ना., त्या गल्लीत कुणीतरी वारलयं हो. पप्पा ऐकूनही न ऐकल्यासारखं तसंच बसून रहायचं., एकसारखं टक लावून खिडकीतून बाहेर पाहण्यात मग्न. त्यांना तसं पाहून मग आई चिडून काहीच न बोलता आपल्या कामाला लागायची. हे सारं मी ऐकलेलं असायचं. कुणाचं कोण वारलयं., हे मला चांगलंच ठाऊक आहे. आईला स्पष्ट बोलायचं आहे, पण ती बोलेना., कारण बहुतेक तिलाही माहीती आहे ना, की या साऱ्या चर्चेत ते नाव येणार आणि ते नाव म्हणजे माझ्या कित्ती जिव्हाळ्याचा विषय.,!! असो., ...

वेड....! ०५/०८/२०२२

तुझा माझ्याकडे असलेला, माझा आवडता फोटो, मी एकांतात असताना एकटक पाहत बसतो. मी तुला पाहतोय, हे तुला कळायला नको, म्हणून मग हलकेच माझ्या हाताने तुझे डोळे झाकतो. मग हळूहळू ते जुने दिवस आठवत, जेव्हा तू समोरून जायची, मी फक्त तुला पहायला, तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलेला असायचो, त्यात हरवून जातो. मग अचानक आठवणींचा भोवरा तयार होतो, त्याच्या तळाशी मी स्वतःला पाहू लागतो. हळूहळू सारं काही शांत होत जातं, निवळतं, मी तसाच असतो, तळाशी.! #वेड #आयुष्य_वगैरे

प्रवास... ०१/१०/२०२२

आपली इच्छा असो वा नसो, पण कुठंतरी थांबावच लागतं. कधी कधी ज्या विचारातून, जे काही सुरू केलेलं असतं, नेमकं तसं अगदी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. मग अशावेळी जे काही घडतंय, त्यापेक्षा ते आपल्या मनासारखं घडत नाहीये, याचा आपल्याला खूप त्रास होत असतो. सारं काही नको नकोस वाटत असतं, स्वतःचा ही तिटकारा येत असतो. "याचसाठी केला होता अट्टाहास".?? हा एकाच प्रश्न सतत आतल्या आत मन खात असतो. शेवटी एक मात्र खरंय, आपली इच्छा असो वा नसो, पण सुरु केलेला प्रत्येक प्रवास हा कुठेतरी थांबतोच.!🎭 #आयुष्य_वगैरे #अडगळ

प्रेम म्हणजे...

मला एकानं विचारलं की., दादा, प्रेम आहे तर मग त्यांनी physical होणं खरंच खूप महत्त्वाचे आहे काय रे.?? त्यावर मी त्याला म्हणालो की, तसं काही नसतं रे. हे प्रेम वगैरे आपण काय फक्त शरीर सौंदर्याला भुलून अथवा फक्त शरीर सुखासाठीच केलेलं असतं काय.? आपण एखाद्याच्या प्रेमात आहोत, म्हणजे नेमकं काय.? हे आपलं आपल्यालाच माहीत नसतं आणि कुणी हा प्रश्न विचारला, तर त्याचा उलगडा आपल्याला नीटसा करताही येत नाही., बरोबर ना.!? हां पण एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे मित्रा की., Physical होणं ही एक मर्यादा आहे, ठराविक वेळेआधी आपण ती पाळलीच पाहिजे. आपण एकमेकांना आयुष्यभरासाठी बांधिल होण्याआधी हे करत असू, तर नंतरच्या आयुष्यात त्याच काहीच नाविन्य राहणार नाही. आणि जर फक्त प्रेमच असेल आणि आपण कधीच एक होऊ शकत नाही, हे ही ठाऊक असेल, तर मग ही मर्यादा कधीच ओलांडू नये.! फक्त प्रेम करतं रहावं आयुष्यभर, सोबत राहून मित्र बनून, सुखदुःखाचा साथीदार बनून.! मित्रा.., एक तत्व मी नेहमी पाळत आलोय, ते तू सुद्धा पाळ.., ' माणसानं लग्नाआधी हनुमान असावं आणि लग्नानंतर राम..!!🎭 #आयुष्य_वगैरे

मित्र..

मनातल्या नेमक्या भावनांना व्यक्त व्हायला, कधी कधी नेमके शब्द सापडतच नाहीत. आपल्याला नेमकं काय होतंय, काय वाटतंय, हे जिथं आपलं आपल्यालाच कळत नसतं, मग ते एखाद्याला सांगायचं तरी काय आणि शब्दांत लिहायचं तरी काय.? पण मनात तर एकसारखं विचारांचं काहूर माजलेलं असतं. याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या body languageवर दिसत असतो, आपल्यासाठी हे सारं जरी नॉर्मल असलं तरी, आपल्या स्वभावाच्या सर्व नाड्या अचूक ओळखणारा आपला एखादा जिवलग हे लागलीच ओळखतो. आपल्याला तर माहीत असतं की, सगळं ठीकच आहे, पण उगाचच त्याला का कुणास ठाऊक आपलं काहीतरी बिनसलं आहे असं वाटतं. मग आढेवेढे घेऊन, आणाभाका देऊन आपल्या मनातलं, आपल्या ओठांवर आणायचा त्याचा प्रयत्न सुरू होतो.!

तडजोड... २९/११/२०२२

त्याच्या त्या दोन ओळी मला नेहमी आठवतात. काही वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं त्यादिवशी, त्याने whatsapp स्टेटस म्हणून, त्या ओळी लिहून ठेवल्या होत्या. अशा होत्या त्या ओळी, "मी तुला वाटत असलो कितीही गोड.., तरीही तू माझ्या आयुष्यातील आणखी एक तडजोड.!!" पण आता ज्या ज्या वेळी तो मला भेटतो, त्यावेळी सध्या तो या तडजोडीची मोजत असलेली किंमत सतत जाणवते. तो ही आपल्यातल्याच, आपल्यासारखा एक सामान्य माणूस, पण जिथं सामान्य माणसाच्या, अतिशय सामान्य अशा स्वप्नांना सुरूंग लागतो ना, तिथं त्याला धड जगताही येत नाही अन् मरताही. अखेरच्या श्र्वासापर्यंत फक्त फरफटच होत असते. तडजोड या गोंडस नावाखाली आपल्या एखाद्या अविरत भळभळणा-या जखमेवर मलमपट्टी करावी, तसं एखादं नवीन नातं आपण स्वीकारतो. पण कित्येकदा जखम बरी तर होतच नाही, आणखीनच चिघळत जाते.!!🎭 #आयुष्य_वगैरे  #अडगळ #त्याच्या_मनातलं

देवा...

आज खूप दिवसांनी आमची भेट झाली. नेहमी सारखाच तो चिंताक्रांत आणि मी प्रश्नार्थक मुद्रेत. तीच चहाची टपरी, तोच आमचा बाकडा आणि त्याचं चहाच्या पहिल्या घोटाबरोबर ते गूढ असं बोलणं.., देवाकडे अगदी निस्वार्थ भावनेने, सहज काही मागितलं की तो ही लगेचच ऐकतो रे. हे असलं लहानपणी वगैरे काही माहीत नव्हतं मला, पण तेव्हा देवासमोर हात जोडल्यावर सहज एकदा बोलून गेलो होतो की, देवा... तिचा विसर न व्हावा..!! बस्स, त्यानंतर आज अखेर देवासमोर हात जोडून आणखी काही मागितलं नाही.! मी हरवून गेलो होतो. 'ती' कुणीतरी आत्ता त्याच्या आयुष्यात आहे की नाही.? या विचारात हरवून गेलो होतो. एव्हाना तो चहा संपवून झपझप पावलं टाकत दिसेनासा ही झाला होता आणि माझी पावलं काही केल्या तिथून उचलत नव्हती.!🎭 #आयुष्य_वगैरे #त्याच्या_मनातलं

वेड...!! ११/१२/२०२२

कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीपासून कितीही दूर असलो, तरी त्या नात्यात काहीही फरक पडत नाही. कधी कधी दररोज बोलणं होतं, तर कधी कधी बरेच दिवस काहीच बोलणं ही झालेलं नसतं, तरीही एक अनामिक ओढ कायम असतेच. आपल्या दैनंदिन दिनचर्येत कळत नकळत आपण त्याला/तिला आठवत असतोच. अशावेळी आपण शेवटचं कधी बोललो/भेटलो होतो.? त्यावेळच्या आठवणी, वा त्यावेळच्या बोलण्यातील एखादी गंमत आठवून, आपण  नकळतपणे एखाद्या क्षणी, एकटेच हलकसं हसूनही जातो. मनाच्या कोपऱ्यात जपलेल्या त्या नात्याप्रमाणेच, ते हसूही अनमोल असतं. 🎭 #आयुष्य_वगैरे #वेड 🌼🌼🌼

आपलं हक्काचं माणूस..

आपल्या माणसांना जपण्यासाठी विशेष प्रयास कधीच करावे लागत नाहीत, ते आपोआप घडत जात. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती परमेश्वराने द्यावी, जिच्यासाठी आपण प्रेमासारखी सुंदर भावना ठेऊ शकू .खरंच प्रेम व्यक्तीला खूप छान बनवत, कारण अशा व्यक्तीच आपल्या आयुष्यात असणं, तिच्यासाठी काही करताना मिळणार समाधान व्यक्तीशः तुम्हालाही एक मानसिक सकारात्मक दृष्टीकोन देऊन जात. तो आनंद शब्दांत व्यक्त करण कठीण. मुख्य म्हणजे वाईट वृत्ती नकळतपणे दूर जातात. आपल भाव विश्व आपल्या व्यक्तीभोवतीच विणलं जात, किंबहुना जगण्याचा खरा उद्देश हेतू खऱ्या अर्थाने त्याच व्यक्तीमुळे कळतो. दिशाहीन आयुष्याला जर खरच एक परिपूर्णता यावी, अस वाटत असेल तर आयुष्यात जिच्यावर नितांत प्रेम करता येईल, अशी प्रेमाची व्यक्ती असणं ह्याशिवाय दुसरा उपाय नाही.!  🎭 #आयुष्य_वगैरे 

समाज..!! २०/१२/२०२२

एकटी बाई असो वा एकटा पुरूष, यापैकी कुणालाही हा समाज सुखानं जगू देत नाही. एकट्या बाईबद्दल वाईट विचार केला जातो, वाईट बोललं जातं, तर एकट्या पुरूषाला सपशेल वाईटच ठरवलं जातं. त्यांच्यातल्या त्या टीचभर जागे पलीकडेही त्यांच अस्तित्व आहे, एक वेगळं जग आहे, हेच मुळी कुणी लक्षात घेत नाही.!! 🎭 #आयुष्य_वगैरे #अडगळ

कॅलेंडर..!! ३१/१२/२०२२

भिंतीवरच्या त्या रंगबिरंगी कॅलेंडर मध्ये, सामान्य माणसाची कित्तीतरी स्वप्नं टांगलेली असतात. काही हळूहळू पुर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत असतात, तर काही फक्त एक तारीख, एक आठवण बनून नेहमी सोबत असतात. काही छळतात, तर काही सुखावतात.!!🎭 #आयुष्य_वगैरे #अडगळ 

अडगळ..!! २४/१२/२०२२

आजपासून वीकेंड वगैरे. तसंही आज चौथा शनिवार सुट्टीच होती, तरीही एकाच अडलं नडलं काम म्हणून ओव्हरटाईम वर होतो, फक्त माणूसकीच्या नात्याने, आर्थिक लाभ वगैरे काही नाही. ते किरकोळ असं काम होतं, तीनेक वाजेपर्यंत आवरलं. आज ब-यापैकी लवकरच गावात परतलो होतो. आता घरी लवकर जाऊन तरी काय करायचं.? म्हणून मग बस स्टॅंडवरच आणखी तासभर बसूयात असं माझं ठरलं. गाड्यांची, प्रवाशांची लगबग सुरू होती. अधेमध्ये गाड्यांचं होणारं announcement, त्यानंतर लगेचच लागणारं एखादं गाणं वगैरे. तरीही मन तिथं रमत नव्हतं. आता तिथं बसून मला जवळपास अर्धा पाऊण तास उलटून गेला होता. तितक्यात ती ओळखीची हाक माझ्या कानावर पडली. दादा.., अहो दादा... पुन्हा एकटेच बसले आहात. त्याला खूप दिवसांनी पाहून मला मस्त वाटलं. मला सुद्धा आता चहाची तलफ झाली होती, म्हणून मग नेहमीप्रमाणे आम्ही चहाबरोबर गप्पा मारण्यासाठी टपरीकडे मोर्चा वळविला. टपरी कडे जात असताना मला कुतूहल लागून राहिलं होतं की, आज हा आपल्याशी नेमकं काय बोलणारं.? गाड्यांची प्रचंड ये-जा सुरू होती. एकसारखी धूळ उडत होती. त्यातच शिट्ट्या मारत मारत, गाड्या अडवून 'पांढरा' बगळा 'माणसे...

वेड...!! २५/१२/२०२२

आत्ता कित्तीतरी वर्षे उलटली, पण अजूनही गल्लीतल्या 'त्या' रस्त्याची ओढ काही केल्या सुटत नाही. तसं तिकडं फारसं जाणं होतं नाही की मी टाळतो, ते सुद्धा कळत नाही. तेव्हा रात्री झोपताना डोक्यात घेऊन झोपलेल्या विचारानेच, सकाळी जागही यायची. सगळी आवराआवर ही आधीच ठरलेली असायची. मग मन तर आधीच त्या वाटेला गेलेलं असायचं, औपचारिकता म्हणून मग मीसुद्धा मनाच्या मागेमागे जायचो. माझ्या घरापासून अगदी छोटसच ते अंतर, पण त्या जागेची, त्या वाटेची इतकी ओढ कधी लागली, हे माझं मलाच अजूनही स्पष्ट आठवत नाही. मनाने असो वा शरीराने, उठसूट नुसतं तिथंच रेंगाळत रहायचं. गल्लीतला तो भला मोठा चौक, तिथं नेहमीच असलेला चिल्ली-पिल्ली, म्हातारी कोतारी यांचा राबता, ते भाभींच छोटंसं दुकान, त्याचा छोटासा कट्टा, कोपऱ्यावरच्या एका दर्ग्यातलं, ते एक भलं मोठ्ठं चिंचेचं झाड, सतत शिव्या देणा-या पण तितक्याच प्रेमळ अशा त्या आऊ मावशी, बोळाच्या तोंडा शेजारीच असणारं त्यांच ते घर, ज्याच्यावर बसून बेरंग जीवनात रंग भरायची स्वप्नं पाहिली होती, मनातल्या मनात कित्येक गाणी गायली होती, तो बरीच वर्षे पडून असलेला तो BSNLचा खांब. अगदी तेव्हापासून...

Date वगैरे... १६/०१/२०२३

का कुणास ठाऊक, पण आज त्याचा हट्ट होता की, मी त्याच्या सोबत कोर्टात आलंच पाहिजे. तासभराचच काम असेल, म्हणून मी सुद्धा वाट वाकडी करून गेलोच. भयानक गर्दी.!! जवळपास सगळ्याच वयाचे चेहरे तिथं दिसत होते. पक्षकारांपेक्षा जास्त वकीलच वकील दिसत होते. तारीख पे तारीख काय असतं, आणि कधी कधी कोर्टात फक्त दहा मिनिटांच्या कामासाठी अखंड दिवस कसा घालवावा लागतो, ते सुद्धा अनुभवलं. पण जे पाहिलं वगैरे, त्या सगळ्याची सल मात्र कायम मनात घर करून राहणार, हे कुठंतरी सतत वाटत होतं. कामकाज आवरल्यावर आम्ही दोघं चहाच्या टपरीवर आलो. दुपारची वेळ सरून जायला लागली होती. हळूहळू हवेत गारठा जाणवू लागला होता. चहाचा वाफाळता कप समोर येऊन आता खूप उशीर झाला होता, पण काही केल्या आम्हां दोघांचा हात चहाच्या कपाकडे जात नव्हता. मनातलं वादळं त्यानं डोळ्यात अडवलं आहे, असं मला वाटतं होतं. त्याचा चेहरा निर्विकार दिसत होता, पण आत खोलवर धाय मोकलून रडणारं, एक लहान मूल, मला दिसत होतं. तितक्यात तो अचानक भानावर आला, एव्हाना थंड झालेला चहा, त्याने गटागटा पिऊन टाकला. मला कसं तरी होतंय रे., मी जातो घरी. पण पुन्हा भेटू तेव्हा नक्की बोलू., नेहमी क...

सरकारी नळ २३/०३/२०२३

तेव्हा घरटी शौचालयं ही नव्हती आणि नळं ही नव्हते. मग कधी बोलावणं येईल तेव्हा टमरेल घेऊन, घराजवळच्या त्या शासकीय धान्य गोदामाच्या बाजूला असलेल्या, बाभळीच्या जंगलात आम्ही जाऊन बसायचो. सकाळ असो वा संध्याकाळ तिकडे टमरेल घेऊन एकटं तसं फारचं कमी जायचो. कारण तिकडं जायच्या आधी, हातात टमरेल घेऊन घराजवळच्या सगळ्या मित्रांच्या घराकडे जाऊन, ऐ.., येतो काय रे.? अशी हाक दिलेली असायची.! नाही.., मी मगाशीच जाऊन आलोय, असं म्हणूनही काही मित्र उगाच सोबत म्हणून यायचेच. मग तिथं बाभळीच्या झाडात जाऊन बसल्यावर, मूळ काम आवरलं असलं तरी, हातात एखादा काडीचा तुकडा घेऊन जमीनीवर काहीतरी गिरगटणं सुरू असायचं. तिथं आमची शाळेतल्या, गल्लीतल्या अशा भरपूर गोष्टींवर खूप वेळ चर्चा व्हायची. संध्याकाळी शाळेतून आल्यावरही, अंधार पडायच्या आधी हाच पॅटर्न पुन्हा एकदा राबवला जायचा. सरकारी नळावर पाण्यासाठी भांड्यांचा नेहमीच ढीग लागलेला असायचा. कधी सकाळी सकाळी एक दोन तास नळाला पाणी सुटायचं, तर कधी संध्याकाळी.! नळाला पाणी यायच्या अर्धा पाऊण तास आधी फक्त हवाच यायची. त्यावेळी शिट्टी वाजवल्यासारखा आवाज यायचा. प्रत्येक घरातलं एखादं म्हातारं म...

०४/०४/२०२३

उन्हाचा ताव आता वाढतच चालला आहे. विहिरीवरची ब-यापैकी सगळीच झाडं, छोट्या छोट्या हिरव्यागार कै-यांनी भरून गेली आहेत. तिथल्या एकमेव अन् विशाल अशा चिंचेच्या झाडावर नेहमीप्रमाणे छोट्या-मोठ्या पक्षांचा बाजार भरला आहे. नाना जाऊन आता बहुतेक दोन तीन महिने उलटून गेले. अंगणातल्या एकुलत्या एका खुर्चीवर आता मावशी बसलेली असते. तिला संधीवाताचा त्रास आहे, त्यामुळे एकदा का एका जागी बसली की मग लवकर उठत नाही तिथून. भरपूर वेळ तिथंच असते ती आता. दररोजच तेच ते जगणं, पण आता ते आपलं माणूस आपल्यात नाहीये, ही जाणीव कित्ती भयानक ना. प्रत्येक दिवशी कित्तीतरी वेळा, तिला नानांनी हाक मारल्याचे भास होत असतील ना. 🎭 #आयुष्य_वगैरे #अडगळ

सुट्टीचा दिवस

आज खूप दिवसांनी त्याची भेट झाली. सुट्टीचा दिवस म्हणून मी मुद्दामच त्याच्या घरची वाट धरली होती. मी त्याच्या घराजवळ पोहचलो, तेव्हा साधारणपणे दहा, सव्वा दहा वाजले होते. पण त्याच्या घराचे दार बंद होते. बाहेर कुलूप ही दिसत नव्हतं. पहिला मी दोन तीन हाका मारल्या. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, शेवटी मी दाराची कडी जोरजोरात वाजवली, तसा लगेचच आतून, आलो आलो, असा आवाज आला. त्याने आतली कडी काढली. आत येताना त्याने बाहेरचे दार पुन्हा बंद केले होते. मी घरात इकडे तिकडे नजर फिरवत होतो. घरात प्रचंड धूळ जमली होती, फक्त नेहमीच्या वापरातील वस्तूंच स्वच्छ दिसत होत्या. तो कधीच माझ्या बाजूला येवून बसला होता. शेजारच्या घरातून रेडिओ वर लागलेलं भक्ती गीत ऐकू येत होतं, घरात बहुतेक तोच काय तो आवाज. मी त्याला आणि त्याच्या घराला असं कधीच पाहिलं नव्हतं. मगाशी त्याच्या घरात प्रवेश करतानाच मला एका गोष्टीची उणीव प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे त्याच्या अंगणात नसलेली रांगोळी. पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे काय बोलावं आणि कसं बोलावं, हे मला काहीच कळत नव्हतं. पण शेवटी या पेचातून त्यानेच मला बाहेर काढले, आणि तो बोलू लागला..,...

२३/०४/२०२३

प्रेम असो, पैसा असो वा कुणी व्यक्ती, यांची सोबत असताना कधीच कदर केली जात नाही. कधी कधी आपण नको तिथं, नको तितकं गुंततो, तर कधी जिथं खरंच गुंतलं पाहिजे, अशा ठिकाणी साफ साफ दुर्लक्ष करतो. कधी कधी आत्ता आहे तो क्षण जगण्याच्या नादात, तर कधी कधी भविष्याच्या नादात वर्तमान क्षणाकडे, दुर्लक्ष करणं सतत सुरू असतं. मग एकदा का उचित वेळ निघून गेली की, शेवटी हाताशी काहीच उरत नाही. आपण तेव्हा फक्त आठवणी कुरवाळत बसतो. क्षणभंगुर सुखाच्या नादी लागून आपण स्वतःला अमर समजू लागलेले असतो, आपण जन्माला आलो, तेव्हाच आपल्या मरणाची तारीखही ठरलेली आहे, हे पुर्णपणे विसरून गेलेले असतो. तसं सगळं काही नश्वर, तरीही अगदी शेवटपर्यंत आपणं, सारं काही माझं माझं करत असतो. जिंदगी..., जब मरना चाहें तो मौत नहीं आती, और जब जीना चाहें तो चैन से जीने नहीं देती..!! 🎭 #आयुष्य_वगैरे #कायपण #मनात_येईल_ते

चारचाकी २४/०४/२०२३

तसा माझा नेहमीचा प्रवास लालपरीनेच., पण कधीतरी मित्राच्या गाडीतून विरंगुळा म्हणून किंवा मग एखाद्या परिचिताने अचानक गाडी थांबवून दिलेली लिफ्ट, या योगाने चारचाकीचा अल्पसा प्रवास माझ्या वाट्याला येतो. अशावेळी गाडीत बसताना नेहमीप्रमाणे सर्वात आधी माझ्या डोक्याला मार लागतो. गाडीत बसल्यानंतर दरवाजा नीट लॉक झाला आहे की नाही, हे पाहण्यात मी दोन चार मिनिटे गाडी थांबवून ठेवतो. त्यानंतर सीट बेल्ट लावताना तर पार गोंधळ उडतो, कुणीकडून काय ओढायचं आणि कशात काय अडकवायचं हे काहीच कळत नाही. मग मित्रच पुढे सरसावून सारे सोपस्कार पार पाडतो. प्रवास सुरू झाला की मग काचा खाली वर करायचं बटन अजिबात सापडत नाही. तेव्हा सहज मनात येऊन जातं की, एवढ्या मोठ्या गाडीत, ही अतिशय महत्त्वाची अशी बटणं, इतकी छोटी का असतात आणि लपवून का ठेवलेली असतात.? आणि माझी ही सारी उठाठेव सुरू असताना, तिथं समोरचं ठेवलेलं एक खेळणं मान हलवून हलवून, दातं काढून हसत माझ्याकडे पाहत असतं.! 🎭 #आयुष्य_वगैरे #चारचाकी

अंगठा २५/०४/२०२३

राशनच्या दुकानासमोर कधीपासून लांबच्या लांब लाईन लागली होती. कुणाचा कुणाशी काही ताळमेळ नव्हता. काही मध्यमवयीन बाया कधीपासून एकमेकींशी वाद घालत उभ्या होत्या. त्या लाईनीत उभं राहू न शकणारी काही म्हातारीकोतारी माणसं, बुड टेकवून आपला नंबर येण्याची वाट पाहत बसली होती. त्यांना त्या वादावादीशी अथवा बाजूला काय चाललंय याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांचा अंगठा, आजतरी त्या मशीनीवर उठणार की नाही, या टेंशननं त्यांना घेरलं होतं. आत मापाडी मापं घालून घालून पार वैतागून गेला होता. या सा-या पासून अलिप्त असलेला सेल्समन, तोंडांत तंबाखूची चिमूट धरून, एकसारखा अंगठं लावून घेऊन पावत्या फाडून देत होता. अधेमधे कुणीतरी जाऊन सतत सेल्समनला सांगत होतं की, कृपया जरा बाहेर पडा, या गर्दीला आवरा, शिस्त लावा. पण सेल्समन काहीही न बोलता फक्त हातवारे करून, अंगठे घेऊन, पुन्हा पावत्या फाडून देण्यात हरवून जात होता. तितक्यात एक सुंदर तरुणी त्या राशनच्या लाईनीत येऊन उभी राहिली. तसा तिचा नंबर ब-यापैकी शेवटचाच होता. त्यामुळे ती अगदी चटकन् सा-यांच्या नजरेत येत होती. तिचं अस्तित्व जसजसं त्या गर्दीला जाणवू लागलं, तसतसं कुणास ...

गावाकडच्या गोष्टी २६/०४/२०२४

गावात दिवसातून एकदा दोनदा येणारी #लालपरी निपचित पडलेल्या गावाला नवसंजीवनी देऊन जाते. तोंडाचं मोकळं बोळकं घेऊन पारावर बसलेली मंडळी, डोळे मिचकावत कोण आलं, कोण गेलं, याकडे लक्ष देत असलेली. ही त्या पाटलाची सून, ह्यो त्या तेल्याचा जावई, हे गावावरून ओवाळून टाकलेलं बेनं वगैरे. तितक्यात #लालपरी ची डबल बेल वाजते आणि पुन्हा एकदा पारावर शांतता पसरते. आणि मग पुन्हा पारावर चर्चा सुरू, आता पुन्यांदा यष्टी कवा हाय रं.?? आता थेट सांच्यालाच, मुक्काम गाडी.! 🎭 #आयुष्य_वगैरे #गावाकडच्या_गोष्टी 

वेड २७/०४/२०२३

माझा वेडेपणा बहुतेक आता लयच वाढत चाललाय, कालही तू स्वप्नात आली होतीस. अॉफिसला सलग सुट्टया असल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून मी तुझ्या गावी मुक्काम ठोकून होतो. दररोज अर्धा पाऊण तासाने तुझ्या सोसायटीच्या समोर फिरत होतो, आणि नेमकं काल मग योग जुळून आला. मी तुझ्या सोसायटीच्या गेटबाहेर थांबलो होतो. तिथून तुमची लिफ्ट माझ्या नजरेला दिसत होती. त्या दिवशी तुमच्या सोसायटीकडे तो माझा चौथा फेरा होता. संध्याकाळची वेळ होती. बहुतेक आजही तू दिसणार नाही, म्हणून मी रूमवर परतणार होतो, तितक्यात लिफ्टचा दरवाजा उघडल्याचं मी पाहिलं. पाहतो तर काय, चक्क तू सोसायटी बाहेर येत होतीस. सोबत एक चिमुकली होती, पण ती आपली चिमणी वाटत नव्हती. तू बाहेर आल्या आल्या मला पाहून अगदी आश्चर्यचकित झालीस. आधी काय बोलावं, ते तुला सुचलचं नाही. तू नजरेनेच मला खुणावून पुढे निघून गेलीस. मग मी तुझ्या मागे मागे चालू लागलो. थोडं अंतर गेल्यावर, तू मला तुझ्या सोबत चालण्यासाठी पुढे बोलावून घेतलसं. तेव्हा माझ्याशी बोलताना आणि माझ्याकडे बघताना तुझा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला होता. कित्ती कित्ती गोड हसत होतीस तू, आणि लाजत ही कित्ती कमाल ...

अनवाणी २७/०४/२०२३

इतक्या रणरणत्या उन्हातही अनवाणी पायांनी चालत असलेली काही लोक नजरेला पडतात, तेव्हा त्यांच्या अनवाणी पायाला होणा-या चटक्यांच्या जाणीवेने मन पुरतं होरपळून जातं.! 🎭 #आयुष्य_वगैरे #अडगळ

पाठलाग ०५/०५/२०२३

सौंदर्यांला स्वातंत्र्याची ओढ असते.! त्याला चिमटीत धरायचा प्रयत्न केला की, वाट्याला येतात त्या फक्त आठवणी, ज्या कणभर रंग बनून आयुष्यभर आपल्या बोटांवर मिरवत असतात. म्हणून आपण फक्त फुलपाखरांच्या मागे मागे धावायचं.! 🎭 #आयुष्य_वगैरे

आठवणी शाळेतल्या...

शाळा घरापासून जवळच होती. शाळेच्या मागे एकूण तीन डांबरी सडक होत्या. त्यातली एक आमच्या शेताकडे ही जायची. तिथं एक रेल्वे फाटक ही आडवं यायचं. कधी कधी नेमकं फाटक लागायचं. पप्पा,‌ आई आणि मी मग उशीरापर्यंत तिथंच उभं रहायचो. तिथून जवळचं मोठा नाला नेहमी वाहता असायचा. त्याचा उग्र घाण वास एकसारखा नाकात अतिक्रमण करत असायचा. रेल्वे तशी खूप लांब असायची, पण ती यायच्या पाच दहा मिनिटे आधीच फाटक बंद झालेलं असायचं. नंतर मग हळूहळू आवाज येऊ लागायचा. स्टेशन जवळ आलयं म्हणून तिचा वेग कमी झालेला असायचा. मी रेल्वेचे डबे मोजण्यात मग्न असायचो. तितक्या वेळात पप्पांनी एक सिगारेट सुलगावलेली असायची. आईला हे आवडत नसल्यानं ती कधीच लांब जाऊन थांबलेली असायची. एकदाची रेल्वे निघून गेली की मग हळूहळू ते फाटक वर जायचं. गडबडीत असलेली सगळी गर्दी इकडून तिकडे तिकडून इकडे जाईपर्यंत आम्ही एका बाजूला उभे राहायचो. सगळी गर्दी पांगल्यावर मग सर्वात आधी पप्पा सायकलवर बसायचं, त्यानंतर पुढच्या आडव्या नळीवर मी आणि आई मागं कॅरेजवर बसायची. तिला तिचा पदर ही सावरायचा असायचा आणि हातात जेवणाचा डबा ही अगदी गच्च पकडून बसावं लागायचं. रस्त्याची एक बा...

धग १३/०५/२०२३

आवडत्या व्यक्तीची होणारी क्षणिक भेट, कडक उन्हाळ्यात संध्याकाळच्या वेळी धो धो बरसणाऱ्या पावसासारखी भासते. हवेत गारवा पसरतो, तेवढ्या पुरताच जीवाला असीम आनंद मिळतो. पण पुढला दिवस उजाडला की पुन्हा एकदा रणरणत्या उन्हाची तीच धग अनुभवायची असते, अन् असे उन्हाळी पाऊस सारखं सारखं पडतही नाहीत ना.! 🎭 #आयुष्य_वगैरे

चैतन्य १३/०५/२०२३

मनाचं घर एकाकी, फक्त चार भिंतींचा संवाद. भिंती माणसाला आसुसलेल्या. तिथं आत जिकडे तिकडे शब्दांचा पसारा अस्ताव्यस्त पडलेला. दरवाजा कधीपासून बंद. त्यावर एक भलं मोठं मौनाचं कुलूप. आठवण नावाच्या जिवंतपणाचं अधेमध्ये येणं जाणं, तेवढंच काय ते चैतन्य. मग पसा-यातून शब्दांची जमवाजमव अन् मेलेल्या मनानं कागदाला जिवंतपण..! 🎭 #आयुष्य_वगैरे #मनात_येईल_ते

कुटुंब १६/०५/२०२३

माझं शिक्षण तसं जेमतेम. शिक्षण सुटलं तसं छोटी मोठी कामे करू लागलो. कामही शिक्षणाच्या मानानं मिळायचं, पण कधी मागं हटलो नाही. हळूहळू २ नंबर वाल्यांशी संपर्क वाढत गेला. तेव्हा माझं वय १५-१६ असेल. चंदनाची तस्करी करू लागलो. भरपूर चांगला पैसा मिळवू लागलो. सन १९७८-८० च्या आसपास एका दाढीवाल्याच्या मदतीने एकटाक सहा गुंठे जमीन घेतली. नंतर पुन्हा काही दिवसांनी ७ गुंठे घेतली. मग काही वर्षांनी गावात एक तीन खोल्यांच तयार घरही विकत घेतलं. पैसा आणि स्थावर मालमत्ता आता भरपूर जमविली होती. मध्यंतरी माझं लग्नही झालं होतं. एक मुलगा आणि एक गोंडस मुलगी. पण त्यांना आजी आजोबा यांच प्रेम काही जास्त लाभलं नाही. माझ्या लेकरांचा जन्म झाला आणि एकाच वर्षात आई वडील दोघांनीही माझी साथ सोडली. वर्षामागून वर्षे जात होती. पोरगं चांगलं शिकून इंजिनिअर झालं. त्याला पन्नास साठ हजार रुपये पगार. पोरगी बी.कॉम करून आता सुखाने नांदत होती. पण जसं माझ्या पोराचं लग्न झालं, तसं अचानकच माझ्या बायकोनं अंथरूण धरलं. सतत औषधपाणी सुरू होतं. ती नांदायला आल्यापासून मी  तिला काहीच कमी पडू दिलं नव्हतं. कॅन्सर असल्याचे निष्पन्न झालं होतं. ...

ओढ १६/०५/२०२३

दिवसभर घराचं घरपण, घरात डांबून ठेवलेलं असतं. बंद घराचा आतल्या आत गोंधळ सुरू असतो. सकाळचे काही क्षण सोडले, तर नंतर घर त्या कोंडमा-याला वैतागून गेलेलं असतं. संध्याकाळ कधी होणार.? घरात माणसं कधी परतणार.? या विचाराने घर सतत घड्याळाची टिकटिक मोजत असतं. झालं हं... आणखी थोडासा वेळ.., आत्ता एवढ्यात माणसं येतील.., अशी समजूत घालत भिंती घराला आधार देत असतात. आणि घरालाही तहान भूक असतेच हो, ती म्हणजे माणसांची.! 🎭 #आयुष्य_वगैरे #अडगळ

पारिजातक

तुला तर माहीतच आहे, तुझी आठवण येत नाही असं काही नाही. आणि तू नेहमी म्हणतेस त्याप्रमाणे आठवण त्यांची काढावी लागते, ज्यांना आपण विसरलेलो असतो. आणि मी तुला विसरणं तर शक्यच नाही गं. आता आजही असंच काहीसं झालं. तुला सांगू आज काय झालं.? ऑफिसहून आल्यानंतर नेहमीसारखाच फ्रेश होऊन अंगणात बसलो होतो. मस्त पावसाळी आकाश सजलं होतं. गार वारा सुटला होता. मोबाईल चार्जिंग ला लावला असल्याने आजूबाजूला हे सारं काही पाहता येतं होतं. जवळपास साडेसहा वाजून गेले होते. तितक्यात सहजच मनात विचार येऊन गेला, तू आणि चिमणी आत्ता काय करत असाल.? मग अचानकच वा-याचा वेग वाढला. अंगावर अचानक तुझ्या आठवणींचा शहारा आला. पलीकडच्या कोपऱ्यातलं पारिजातकाचं झाडं आनंदाने बागडू लागलं. त्याच्या पानांची ती सळसळ ऐकून मला क्षणभर असं वाटलं की, तू बहुतेक इथेच कुठेतरी माझ्या आसपास आहेस. मी आसपास नजर फिरवली, पण तो मात्र भास होता. मग बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर पारिजातकाचा मनमोहक सडा पडला. माझ्या प्रत्येक श्वासात अचानक तुझ्या आठवणींचा सुवास, तो गुंफून गेला. मी डोळे गच्च मिटून घेतले आणि त्या दिवशीची, तुझी ती पारिजातकाच्या फुलांनी भरलेली ओंजळ पा...

प्रेम वगैरे..

Well settled आहे ती आता तिच्या आयुष्यात. आमची एवढी जुनी मैत्री आम्हाला काही दिवसांपूर्वीच नव्याने सापडली आहे. खूप खूप Thanks to तिलाच. त्यायोगे मग आता एकमेकांची विचारपूस सुरू असते अधेमधे. कधी कधी chatting तर कधी दोघांनाही आवडणारा आणि तिला मोकळा करणारा, तिला खूप खूप हसवणारा आमचा फोनवरचा संवाद. ती खूप खूप बडबडते. अगदी लहान मुलागत. त्यातल्या त्यात तिचं हसणं बाकी विषेशच वाटतं. पण बोलता बोलता सतत मला बुचकळ्यात पाडत असते. क्षणभर काय बोलावं कळतच नाही मला. आणि मग अशा वेळी मला निरूत्तर झालेलं पाहून पुन्हा हसायला लागते. मस्त वाटतं.  ती - हे प्रेम वगैरे मलाही खूप करू वाटायचं रे. कुणीतरी आपल्याला जीव लावावं, आपला एक boyfriend असावा, आपण त्याच्या हातात हात घालून फिरावं. पण पप्पांची मान खाली जाईल असं मला काहीच करायचं नव्हतं. So म्हणून मी कधीच त्या वाटेला गेली नाही. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? सांग ना रे मला. आता तुझंच उदाहरण घे ना. मी तुला इतकी का आवडायची आणि अजूनही आवडते. का बरं.? असं काय पाहिलंस माझ्यात.? कधी तुझ्याशी बोलले नाही, कधी आपला इतका काही परिचय सुद्धा नाही. तरीही का रे ...

मनातली वादळं

आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य आपल्याला दिसतं तितकं साधं सोपं नसतं. जो तो आपापल्या विचारांच्या चक्रव्यूहात अडकलेला असतो. त्याच्या मनात चाललेली खदखद, फक्त त्याची त्यालाच ठाऊक असते. शेवटी कितीही बोलका अथवा मनमोकळ्या स्वभावाचा माणूस असला तरी प्रत्येकजण आपल्या उराशी, फक्त आपल्यापुरतेच मर्यादित असणारं एक गुपित बाळगून असतो.

२७ मे २०२२

त्याची भेट, त्याचं ते तर्कहीन बोलणं हे सारं काही आता माझ्या सुध्दा अंगवळणी पडलंय. कोप-यावरची ती चहाची टपरी, मी आणि तो, आता हे समीकरणच जुळलयं. तो बोलत हरवून जातो आणि मी ऐकत हरवून जातो अन् मी भानावर आलो की तो कधीचा निघून गेलेला असतो, पुन्हा एकदा नव्याने मला भेटण्यासाठी. आता आजची भेटही सहज घडून आलेली आणि हे असलं त्याचं कोड्यात टाकणारं बोलणं.. "आज बहुतेक माझ्या घरातील सारे 'डास' घर सोडून गेले.! बिच्चारे., ते तरी काय करणार.!? काल रात्रीच मला त्यांच्या समाजाची मिटींग वगैरे आहे असं मला कळालं होतं. दोन वर्षे व्हायला आली, एकाच माणसाला चावतोय आपण. त्यामुळे व्हरायटी नसलेने, काही डासांत माणसांची लक्षण दिसू लागलीयत म्हणं. म्हणून मग त्यांनी एकमताने, एकमुखाने ठराव संमत करून हे घर सोडून दुसरीकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला."

09/10/2022

वरवर सुंदर दिसणाऱ्या एखाद्या शांत ज्वालामुखी प्रमाणे जगत असतो पुरूष. आपल्या आजूबाजूला असलेली हिरवळ जपावी, म्हणून तो स्वतःला सतत आवर घालत असतो. आतल्या आत धुमसत असतो, जळत असतो. कारण एखादी गोष्ट मग ती चांगली असो वा वाईट, त्याबद्दल अगदी बेधडक आणि रोखठोक बोलण्याचा अधिकार हा पुरुषांना बहुतेक वेळा कधी नसतोच. मग हे सारं काही मनातल्या मनात साठत असतं आणि खदखदत ही असतं. सतत, अविरतपणे सगळं फक्त साठत राहतं. असे कितीतरी चालते फिरते ज्वालामुखी आयुष्यभर फक्त आतून जळत राहतात, पण त्यांची ती खदखद, आत धुमसत असलेली आग, ती धग कधीच बाहेर येत नाही. आणि त्याची झळ आजूबाजूच्या लोकांना कधी जाणवतही नाही. आणि हा so called समाज वगैरे फार पुर्वीपासून सतत म्हणत आलाय की, सगळे भोग हे फक्त आणि फक्त स्त्रीच्याच नशिबी लिहलेले असतात. पण पुरूष काय आणि स्त्री काय. आयुष्यभर जळत तर सगळेच असतात. स्त्रियां रडून, बोलून मोकळ्या होत जातात, पण पुरूषांना तर रडायची आणि बोलायची ही चोरी असते. पुरूषांना ही त्यांच्यां व्यथा जाणून घेणारं, मायेनं गोंजारणारं, आधाराचे चार शब्द सांगणारं असं कुणीतरी हवं असतं. सगळेच पुरूष वासनांध आणि शरीर सुखाला ...

23/10/2022

तसं पहायला गेलं तर अधेमध्ये आई आंघोळ घालतेच, पण दिवाळीच्या काळात आपल्या वाट्याला येणारी, आईच्या हातची आंघोळ, कित्तीतरी अभंग अशा आठवणींनी समृद्ध असते, बहुतेक म्हणूनच या 'अभंग' अशा आठवणींच्या स्नानाला 'अभ्यंगस्नान' म्हणत असावेत. आपल्या अंगाला हळूवार हातांनी तेल/उटणे लावत असताना, मंजूळ आवाजात एखादी अंगाई सुरू असावी, त्याप्रमाणे तिचं हे आठवणींचा सडा शिंपन सुरूच असतं. तिच्याकडून आपल्या बालपणीच्या त्या गोष्टी ऐकून आपल्याला खूप हसू येत असतं, आणि कुतूहलाने आपण विचारत असतो की., आई.., खरंच मी असा वागायचो काय गं लहानपणी.? दिवाळीसाठी माहेरी आलेल्या आत्त्याच्या मुलांशी सर्वात आधी आंघोळ करण्यासाठी भांडणं, आंघोळीच्या आधी तेल/उटणे लावून घेण्यासाठी ताई/आई समोर उघडाबंब बसला असताना थंडीने अंगावर येणारा शहारा, ताईने मुद्दामहून काढलेली आपली खोड, डोळ्यात साबणाचा फेस गेला की आपली होणारी रडारड, काल रात्री हातावर काढलेली मेहंदी आता आंघोळ करताना धुवून जाईल काय गं आई.?? या आपल्या प्रश्नावर सगळ्यांना अनावर झालेलं हसू.., अशा कित्येक समृद्ध आठवणींच, आपल्याला समृद्ध करणारं, हे अभ्यंगस्नान..!!🎭

श्वास

सगळे आप्तस्वकीय माझ्या आजूबाजूला जमलेत. त्यांची चलबिचल सुरू आहे. माझ्या एखाचा जिवलगाचा हुंदका दाटून आलेला आहे. आत स्वयंपाक खोलीत आल्या गेल्या पाहुण्यांचं चहापान करून वैतागलेल्यांचा विषय वेगळाच. आत नेमकं काय चाललंय, यापासून संपुर्णपणे अनभिज्ञ अशा बच्चे कंपनीने अंगणात धुमाकूळ घातला आहे. आणि या सगळ्या कोलाहलात, अगदी निपचित पडलेला माझा देह शेवटचे श्वास मोजतो आहे. शरीराची जराशी ही हालचाल नाही. फक्त छातीची हालचाल जाणवते आहे, ती पण फक्त आल्यागेल्या श्वासाचं प्रमाण म्हणून माझं तोंड एकसारखं सताड उघडं पडलं आहे. त्यात अधेमधे सतत कुणीतरी येऊन चमच्याने पाणी सोडत आहे, आणि मी विचार करत आहे की सगळं काही संपल्यात जमा आहे आता. किती तरी दिवसांपासून आपण असेच पडून आहोत. कुणी आलं, कुणी गेलं, कुणी काय बोललं, ते काहीच कळत नाही. जन्माला आल्यापासून जो सोबतीला आहे, अजूनही तोच सोबतीला आहे, माझा श्वास! आणि आता मी, तो कधी एकदाची माझी साथ सोडतोय, याची वाट पाहतो आहे.!  #आयुष्य_वगैरे #अडगळ

जीना ईसी का नाम हैं..

आपल्याला सतत वाटत असतं की, आपलीच लाईफ खूप tough time मधून जात आहे, आपल्या इतके problems आणि tension इतर कुणाच्याही आयुष्यात नसतील, प्रत्येकाचं दुखणं आणि त्याचा त्यांच्यावर परिणाम हा व्यक्तीपरत्वे वेगवेगळा असतो हे मान्यच, तरीही how u react आणि how u accept ur condition & handle it, हे ही तितकेच महत्वाचे असते. आज असाच एक छोटासा प्रवास, पण खूप मोठ्ठं काहीतरी सांगून गेला. प्रवास, तो ही अॉटोचा. मागे बसायला जागा नव्हती, म्हणून मग पुढे जाऊन चालकाशेजारी बसलो. मागच्या बाजूला चालकाच्या ओळखीची एक व्यक्ती होती, अधेमध्ये त्यांचं संभाषण सुरू होतं. ती व्यक्ती चालकाच्या तब्येतीची चौकशी करीत होती. त्या दोघांच्या बोलण्यातून माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती की, याला इतकं नेमकं झालं तरी होतं काय.? म्हणून मग मी थेट चालकाशी बोलू लागलो. तो माझ्यापेक्षा थोडासा वयस्क दिसत होता, म्हणून मग त्याला 'दादा' असं संबोधून मी विचारपूस केली. तो सांगू लागला., ''माझं आयुष्य मस्त मजेत चाललेलं. आधी लुकडा होतो, मग जिम लावली, चांगलं शरीर कमावलं, आणि योगायोगाने, माझ्या कमावलेल्या त्या सुडौल शरीराचं बक्षीस म...

एकतर्फी

 तब्बल आठवडा आधीच मी तयारी सुरू केली होती. एक ग्रिटींग कार्ड घेतलं होतं आणि एक गुलाबाचे फुल, नेमकं त्या दिवशी घ्यायचं ठरवलं होतं. मनाची खूप तयारी केली होती. इतक्या वर्षांपासून आपलं असलेलं अबोल प्रेम, त्या दिवशी तिच्या समोर व्यक्त करायचं होतं. मनाला कुठंतरी वाटतं होतं की, बस्स.. खूप झाली आता नजरानजर. कधी, कुठे, कसं, हे #वेड आपल्याला लागलंय ते काही माहिती नाही, पण आता या वेडेपणाच्या निमित्ताने, त्या वेडेपणाला भेटायचं होतं, बोलायचं होतं. आणि मग एकदाचा तो दिवस उजाडला. फुल मार्केटमधून मी एक गुलाब घेतला. ग्रिटींग कार्ड घेताना खूप गोंधळलो होतो, कारण माझ्या मनातलं तिला नेमकं कळावं, असे शब्द कुठल्याच कार्डवर दिसत नव्हते. म्हणून मग एक साधचं कार्ड घेऊन, कधीतरी कुठंतरी वाचलेल्या दोन ओळी, साध्या बॉलपेनने मी त्यावर लिहल्या होत्या. तिच्या क्लासची वेळ हेरून, तिच्या नेहमीच्या वाटेवर डोळे लावून, मी तिची वाट पाहत होतो. कुठं थांबावं, कसं थांबावं काहीच कळतं नव्हतं. सतत जागा बदलत होतो. अगदी सकाळची वेळ, त्यामुळे बरीच ओळखीची मंडळी गाठ पडत होती, त्यांना कसंबसं टाळून, हातातलं कार्ड आणि गुलाब लपवत होतो. तेव्...

अडगळ

एका गावात पारायण सुरु होतं, म्हणून नेहमीच्या मार्गावरील वाहतूक, गावकऱ्यांनी पर्यायी मार्गाने वळवली होती. रस्ता थोडा अडगळीचा, त्यामुळे चालकांना खूप कसरत करावी लागत होती. दररोज तिथं किरकोळ वाद, हमरीतुमरी, शिव्याशाप, धक्काबुक्कीचे प्रकार घडत होते. आणि हे सगळं सुरू असताना... जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हो तुला पाही आलो कशापायी आलो, मांडला कहुणी पसारा, कुण्या दिशेला हा चालला प्रवास, भेटेल का कुण्या ठाई थारा.. या गाण्याच्या ओळी कानावर पडत होत्या.!

आठवणी शाळेतल्या..

आमची शाळा मारूतीच्या मंदिरामागे होती. शाळेला वेगळं मैदान असं नव्हतंच. आमची प्रार्थना, दैनंदिन परिपाठ आणि इतर सगळे कार्यक्रम वगैरे नेहमी मंदिराच्या परिसरातच व्हायचे. नंतर बहुतेक काही वर्षांनी, रस्त्याच्या पलीकडे असलेल्या रिक्षा स्टॉपच्या मागील, भाड्याने घेतलेल्या २ खोल्यांत ६वी, ७वी चे वर्ग भरायचे. जेवायच्या सुट्टीची बेल वाजली की आम्ही थेट मंदिराचा कट्टा गाठायचो, तर कधी आत मंदिरात बसायचो. आधीच जळलेल्या अगरबत्त्या आणि कापूर यांचा सुवास तिथं नेहमीच दरवळत असायचा. मारूतीच्या पायाशी वाहिलेली साखर घेऊन जाण्यासाठी मोठमोठ्या काळ्याकुट्ट मुंगळ्यांचा तिथं नेहमीच बाजार भरलेला असायचा. डबे उघडून आपापल्या भाज्या एकमेकांना वाटून झालं की आम्ही जेवायला सुरुवात करायचो. जेवताना नेहमीच नजर इकडं तिकडं भिरभिरत असायची. भिंतीवर लिहिलेलं भीमरूपी महारूद्रा... नकळतपणे वाचून काढलं जायचं. आमचं जेवण सुरू असताना मंदिरात मारूती भक्तांचा राबता सुरूच असायचा. अधूनमधून कानी येणारा घंटानाद मस्त वाटायचा. शाळेत पाण्याची सोय नव्हती, त्यामुळे जेवणं आवरलं की मग आम्ही पाणी प्यायला, आणि डबे धुवायला, मारूती मंदिराच्या आवारात असलेल...

अडगळ

काल खूप दिवसांनी तो भेटला. तसं ठरवून आम्ही फारच कमी वेळा भेटलोय, कारण तसं जमतच नाही. दुपारची वेळ. यंदा उन्हाचा ताव ही नेहमीपेक्षा जास्तच. सावली, किरकोळ गप्पा टप्पा आणि चहासाठी आम्ही लागलीच टपरी जवळ केली. छोटंसं पत्र्याचं खोकं, पण तिथं मिळत नाही अशी कुठली गोष्ट नव्हती. मी चहा सांगणार, तितक्यात त्यानं मला थांबवलं आणि म्हणाला की, शरद तू बहुतेक जेवला नसशील अजून. आपण एक काम करूयात, आधी मस्तपैकी तुझा आवडता गरमागरम वडापाव खाऊ आणि मग चहा घेऊ. मी हसून होकार दिला. दोघांनाही तीन तीन वडापाव खाल्ले. मस्त वाटलं. मग काही क्षणांतच मस्त वाफाळणारा चहाचा ग्लास टेबलावर बसून आमच्याकडे पाहू लागला. उन्हाच्या झळा आता आणखी खूपच तीव्र जाणवत होत्या. अंग घामानं पुरतं भिजून गेलं होतं. अधेमधे येणारी हवेची एखादी झुळूक खूपच सुखावून जात होती. मी त्याला काही विचारणार तितक्यात तो बोलू लागला. आपण वयाची छत्तीशी कधीच ओलांडलीय. अजून किती जगू माहीत नाही. तुला तर माहीतच आहे, आता जवळपास तीन वर्षे व्हायला आली, मी एकाकी जीवन जगतोय. मला कुणीच नाही असं नाही, पण तरीही मी एकाकीच आहे, आणि इथून पुढेही असाच एकाकी असेन. दिवस कामाच्या व्...

शेवटची ओढ

कित्ती आटापिटा केला होता मी, कित्ती गयावया करत होतो. कुठंतरी माझ्याही सहनशक्तीचा अंत जवळ आलेला होता. तू अगदीच निर्विकार वागत होतीस‌. माझे पाण्याने डबडबलेले डोळे, दाटून आलेला हुंदका यातलं काहीच तुला न दिसावं, याच मला आजही नवल वाटते. तू निघून गेलीस तरीही मी बराच वेळ त्याच ठिकाणी उभा होतो. त्यादिवशी मी तुला दिलेली ती शेवटची साद होती., ती शेवटचीच ओढ होती.! #अडगळ

२१ जुलै २०२२

आठवणींच्या गावाला जाणारी पाऊलवाट असते नागमोडी वळणाची, तर कधी ओबडधोबड, तर कधी अगदी एका सरळ रेषेत. ही पाऊलवाट असते तर खूप छोटीशी, पण ती वाट संपल्यानंतर नजरेस पडणारा तो गाव किती समृद्ध असतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला किती समृद्ध करून जातो, हे ज्याचं त्यालाच चांगलं ठाऊक. तिथं होणारा भावनांचा आविष्कार कधी शब्दांत मांडतो येतो, तर कधी शब्दांपलीकडे असतो, फक्त नि फक्त अनुभव घेण्याजोगा. इथं खोटेपणाला अजिबात जागा नसते. या गावाला दिलेली भेट प्रत्येक वेळी जगणं समृद्ध करून जाते, जगण्याचा एक नवीन अनुभव देते. #आयुष्य_वगैरे

जीवनगाणे

येणारा जाणार प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. एखाद्या दिवशी सारं काही मनासारखं घडतं असतं, तर एखाद्या दिवशी नेमकं याच्या उलट. पण तरीही प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण आनंदी असतोच. कारण दिवसभरात आपल्या नकळत आपल्या वाट्याला येणारे ते आनंदाचे क्षण.! खरंच., दररोज कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आपला संपूर्ण दिवस मजेत जायला कारणीभूत ठरलेल्या असतात. जरा विचार करा आणि आठवून बघा., म्हणजे सारं काही तुम्हाला उमगेल. दररोज सकाळचा पक्ष्यांचा किलबिलाट, घराच्या खिडकीतून तिरपी येणारी सुर्याची पहिली किरणं, गरमागरम चहाचा तो मदमस्त सुवास, शेजारून कुठंतरी भाकरी थापण्याचा येणारा आवाज, एखादा जठराग्नी पेटवणारा फोडणीचा दरवळ, आपण मनातल्या मनात गुणगुणत असलेलं आणि नेमकं त्याचवेळी tv, radioवर लागलेलं ते गाणं, घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या बाळाने दिलेला एक गोड मुका, तिचा 'संध्याकाळी लवकर घरी या हं..' असा प्रेमळ हुकूम, मग पुन्हा प्रवासातली मजा, ओखळपाळख नसताना कुणीतरी दिलेलं स्माईल, कामाच्या ठिकाणी कितीतरी ताण असताना कुणीतरी अचानक केलेली एखादी मिश्किल टिप्पणी आणि त्यानंतर पिकलेला हशा, दुपारच्या वेळी टिफिन वाटताना एकम...

माणूस

आपल्या वागण्याचा कधी कधी आपल्यालाच ताळमेळ लागत नाही. आपण जे वागलो, बोललो, ते चूक की बरोबर काहीच कळत नाही. Heat of the moment म्हणून आपण त्याकडं कानाडोळा करत असतो. आपल्या मनाला पटत नसतानाही, एखाद्या व्यक्तीचा अथवा त्यांच्या ठराविक गोंष्टींचा, वागण्या बोलण्याचा आपल्याला त्रास होतो, हे माहीत असूनही त्यांच्यांशी नेहमी आपण सबुरीने, सामंजस्याने व प्रेमाने वागत असतो, आणि याउलट जी व्यक्ती अगदी निस्वार्थपणे आपल्याला जीव लावते, प्रेम करते, आपण जराही दुखावले जाऊ नये याची काळजी घेते, अशा व्यक्तींनी आपण कायम  त्यांना गृहीत धरून, आपल्याशिवाय त्यांच पानही हलत नाही असं समजून त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष करीत, तुटक तुटक वागत असतो. आपल्या नकळत आपण त्यांच्यावर मालकी हक्कच गाजवत असतो, आणि ते सुद्धा मोठ्या मनाने आनंदाने स्वीकारत असतात. तरीही कधीतरी आपल्या अशा वागण्यचा आपल्याला पश्चात्ताप तर खूप होत असतो, क्षणार्धात आपण माफीही मागितलेली असते, तरीही आतल्या आत आपलं मन सतत आपल्याला खात असतं. असं वागायला नको होतं आपणं, असं बोलायला नको होतं आपणं.! खरंच.. गोष्ट हातातली होती, पण आपल्या त्या तेवढ्याशा छोट्याशा क्...

ती आणि पाउस

तिला पाऊस आवडतो, खूप खूप आवडतो. तिच्या घराजवळ, अंगणात, शाळा कॉलेजातून येता जाताना संधी मिळाली की मनसोक्त भिजताना पाहिलंय मी. तिच्या आवडीचा पाऊस म्हणजे तो पावसाळ्याच्या आधीचा, तासभर धो धो पडणारा नव्हें हं., तर तिचा पाऊस म्हणजे पावसाळा.!! अलगद... हळूवार... एकसारख्या नुसत्या सरीवर सरी.!! तिच्या भावंडांबरोबर पावसात भिजताना एक दोनदा पाहिलंय मी तिला. तेव्हा वाटून जायचं की तिचं आणि पावसाचं बहुतेक खूप जुनं नातं आहे. तिला तसं पाहून वाटायचं की, पावसात भिजायला वय नसतं. पाऊस आणि तिचं नातं घट्ट आहे. कधी कधी ते तिच्या आवडीच्या गाण्याच्या लयीतून, तर कधी रिमझिम बरसणाऱ्या सरीतून, नकळत दिसून येतं. 

मनातलं

दिवसभर सोबत घेऊन फिरलेला हा सगळा मनातला पसारा आहे. घरात लय पसारा झाला की तो आपण आवरतो, घर साफ होत, आणि मी मनात लय पसारा झाला की तो मोबाईलच्या Notes मध्ये उतरवतो, मन हलकं होतं. आईच्या पोटातून बाहेर आल्यावर आपण जे रडतो ना, ते काही उगाच नसतं. ती तर फक्त सुरूवात असते. जन्माला येतो तेव्हा नाव नसतं, आणि जेव्हा आपण मरतो तेव्हा फक्त नावच राहतं. मुळातच आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे परिक्षा द्यायला, निर्णय घ्यायला. आणि हे सारं करता करता आपली जी काही वाटचाल सुरू असते, त्याला आपण जगणं म्हणतो. चढ उतार येत असतात आणि आपला प्रवास सुरू असतो. आपल्या आयुष्यात एक झालं की एक, एक झालं की एक काही तरी problem सतत सुरू असतात. आपण त्याला कर्माची फळ किंवा भोग म्हणून सोसत असतो. कुणी जिंदादिल त्याला "जीना इसीका नाम है" म्हणून पाठीवर टाकून पुढं जातो, तर कुणी "नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते" या भावनेने सदैव त्यासाठी तयार असतो.  एखादी गोष्ट आवडल्यावर लहान मुलं कसं कंटाळा येईपर्यंत त्या वस्तू सोबत खेळत असतं आणि मग मन भरलं, कंटाळा आला की ती गोष्ट टाकून देतं आणि पुन्हा त्...

भाऊबंद

भावकी.!! भावा भावात शक्यतो कधीच पटत नाही, अपवाद असतीलही, पण फारच दुर्मिळ. घरोघरी मातीच्या चुली, अन् आमच्या घरीही तेच चित्र होतं. पप्पा लहान भाऊ, काका मोठा भाऊ, त्यात आणि काका 'टाकेश' गटातील. त्यामुळे सुट्टी दिवशी आणि प्रत्येक संध्याकाळी घरात वातावरण तसं तंगच असायचं. काकांकडून आजोबांना, वडिलांना, बायकां पोरांना किरकोळ मारहाण व होलसेल मध्ये शिव्या ठरलेल्याच असायच्या. या साऱ्या खटाटोपात घरच्या दोन सुना म्हणजे माझी आई आणि काकी हकनाक भरडल्या जायच्या. तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती, त्यामुळे घरचं, शेताकडचं, जनावरांचं हे सारं करून त्या दोघींचा जीव पार मेटाकुटीला आलेला असायचा. माझा भाऊ दोनेक वर्षांचा असेल आणि मी अजून आईच्या पोटात बहुतेक चार पाच महिन्याचा. तेव्हा अशा प्रत्येक वेळी माझ्या काकीनं माझ्या आईला खूप आधार दिलाय. कधी कधी तर वातावरण इतकं बिघडलेलं असायचं की रात्रीच्या वेळी घरात कुणीच जेवलेलं नसायचं. सगळे तसेच उपाशीपोटी झोपलेले असायचे. अशा प्रत्येक वेळी माझ्या काकीनं रात्री अपरात्री उठून माझ्या आईच्या पोटात अन्नाचा दाना टाकलाय, कारण ती पोटूशी होती म्हणून. माझ्या काकीच्या या कधीही फेडत...

घर

घरामध्ये वर्षानुवर्षे एखाद्या गोष्टीला एक ठराविक अशी जागा ठरलेली असते. कालांतराने त्याची ती जागा जरी बदलली, तरीही इतक्या वर्षांच्या सवयीमुळे नकळत आधी आपण त्याच मूळ जागी जात असतो अन् दोन चार पावलं जातो न जातो तितक्यात थबकून मागे वळत असतो. जिथं एखाद्या निर्जीव वस्तूतही सवयीमुळे आपला इतका जीव अडकलेला असतो, तिथं मग आपल्या जीवाभावाची माणसं आपल्यात नसताना जीवाची होणारी घालमेल आणि तगमग याने शरीर आणि मन सतत धुमसत असते.! याची धग कुणाला दिसतही नाही अन् जाणवतही नाही.🎭 #आयुष्य_वगैरे

मन

मनानं तरूण असणारे आपण शरीरानं थकू लागलोय, हे स्वीकारायला आपलं मन कधीही तयार नसतं. आपल्या वागण्या बोलण्यात, दिसण्यात होणारे बदल याकडे आपण जरी दुर्लक्ष करीत असलो तरी आपल्या आजूबाजूच्या लोकांचे या गोष्टींवर फार बारीक लक्ष असते. यातूनच कधी कधी आपल्यासाठी नेहमी आपल्या कानावर पडणारी 'ऐ'  अशी हाक मग 'अहो' अशी बदलून जाते, हे आपल्या सुद्धा लक्षात येत नाही. #अडगळ #आयुष्य_वगैरे

सोबत

सोबत महत्त्वाची असते. "तुमचं अस्तित्व, महत्व, किंमत आणि तुम्ही मांडलेलं मत" हे सारं काही तुमच्या सोबतीवरच अवलंबून असतं. तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून तुमची पारख ही सहसा तुमच्या सोबतीवरूनच ठरवली जात असते.!🎭 #आयुष्य_वगैरे

१४ ऑक्टोबर २०२१

प्रिय सखी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष,                          पत्रास कारण की, आपल्या मैत्रीच्या नात्याबद्दल थोडं बोलायचं होतं. अगं.. कधी काळी तुझ्या भेटीसाठीची, तुला एकदा बघण्यासाठीची ओढच एवढी होती ना की, आता तू भेटल्यावर तुझ्या प्रेमळ सहवासात जात असलेला प्रत्येक क्षण, एक एक दिवस सतत स्मरणात राहतो. इतक्या वर्षांनी तू अशी माझ्या आयुष्यात येशील याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, आणि आज ते सगळं याची देही याची डोळा अनुभवतोय, तरीही माझा विश्वास बसत नाही. आज फक्त ५ महिने झालेत गं आपल्या मैत्रीला. पण असं वाटतं की खूप खूप लहानपणापासून आपण एकत्रच वाढलोय. हे असं वाटण्यात सुद्धा तुझा खूप मोलाचा वाटा आहे, कारण तू इतक्या चांगल्या पद्धतीने मला समजून घेतलं आहेस व आपलसं केलं आहेस. Thanks दोस्त. या आपल्या मैत्रीच्या थोड्याशा कालावधीत तू मला इतकं भरभरून प्रेम दिलयसं ना की, एवढ्या या प्रेमावर आणि तुझ्या या गोड आठवणींवर मी माझं उर्वरीत आयुष्य अगदी आनंदाने जगू शकतो. आणखी काही नको मित्रा, फक्त अशीच साथ दे तू मला.!! मैत्री आपली फुलासा...